नर्तिका पूजा गायकवाडचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; दिवाळी तुरुंगातच जाणार

आत याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिन्याभरापासून तुरूगांच्या गजाआड असलेल्या पूजाची दिवाळीदेखील तुरूंगातच जाणार आहे.

Pooja Gaikwad

Pooja Gaikwad

बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Beed) यांच्या मृत्यूमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी साधारण महिन्याभरापूर्वी आयुष्य संपवलं. पूजा हिने केलेलं ब्लॅकमेलिंग तसंच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, यामुळे गोविंद यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणात पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला ताब्यात घेतलं.

आत याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिन्याभरापासून तुरूगांच्या गजाआड असलेल्या पूजाची दिवाळीदेखील तुरूंगातच जाणार आहे. कारण न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.

प्रकरण काय ?

गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे पत्नी, मुलं, कुटुंबीय यांच्यासह रहात होते. मात्र, विवाहीत असूनही वर्ष-दीड वर्षापूर्वी ते पूजाच्या प्रेमात पडले. कलाकेंद्रात झालेल्या ओळखीचे मैत्रीत व नंतर प्रेमात रुपांतर झाले. पूजाचे गोविंदशी प्रेमसंबंध सुरू झाले. परंतु, तिच्यासाठी ते फक्त कस्टमर होते, ज्याच्याकडून महागड्या वस्तू, पैसे, सोनं-नाणं, जमीन वगैरे उकळता येईल.

वर्षभराच्या काळात गोविंद यांनी पूजाला महागडे मोबाईल, दागिने, पैसे, मालमत्ता बरंच काही घेऊन दिलं, मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला. मात्र, एवढं करूनही पूजाची नजर बर्गे यांच्या गेवराईतील बंगल्यावर पडली. तो बंगला माझ्या नावे करा असा तगादा दिने गोविंदकडे लावला, तसंच माझ्या भावाच्या नावे जमीन करून द्या अशीही मागणी तिने केली. बर्गे यांना ते मान्य नव्हतं. त्यानंतर त्यांच्यातील वाद खरा विकोपाला गेला.

मराठा समाज अन् आमच्यात अंतर पडल ते या दरिंदे पाटलामुळे; भुजबळांची बीडमधून जरांगेंवर टीका

पूजाने हळूहळू त्यांच्याशी बोलणं कमी केलं, फोन उचलायची नाही, तरीही गोविंद बधले नाहीत. हे पाहून तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. खोट्या गुन्ह्यात अडकवेन , अत्याचार केला असा आरोप करेन अशा धमक्या तिने गोविंद यांना दिल्या. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचं हे रूप पाहून गोविंदला धक्का बसला, तरीही त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केवला, मात्र तिने काहीच ऐकले नाही.

ज्या रात्री गोविंद यांचा मृत्यू झाला, त्याआधी संध्याकाळी ते पूजाला भेटण्यासाठी तिच्या सासुरे गावी, घरी गेले, मात्र ती तिथे नव्हती, फोन उचलत नव्हती. तिच्या आईनेही त्यांना फार प्रतिसाद दिला नाही, अखेर गोविंद यांनी व्हिडीओ कॉल करत आत्महत्येचा इशारा दिला. मात्र समोरून कोणीच प्रतिसाद दिला नाही. हे पाहून गोविंदचा ताप वाढला, ते रागातच कारमध्ये बसून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला.

पूजाला जामीन नाहीच

याप्रकरणी गोविंद बर्गेच्या मेहण्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतलं.तिच्यामुळेच गोविंदचा जीव गेला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. तिला आधी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले, नंतर न्यायलयात हजर केल्यावर न्यायलयाने तिची रवानगी तुरूंगात केली. तिने पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, तिला जामीन मिळू नये यासाठी जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत बाजू मांडली. त्यावरून न्यायालयाने तीला जामीन नाकारला आहे.

Exit mobile version