डायल 112 आपत्कालीन सेवेला केला फोन; न्यायालयाने सुनावली शिक्षा, काय घडलं?

संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असून विनाकारण पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केल्याचे निदर्शनास आले.

112 Healpline

डायल 112 आपत्कालीन सेवेला केला फोन; न्यायालयाने सुनावली शिक्षा, काय घडलं?

डायल 112 आपत्कालीन सेवेला विनाकारण (112) कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणार्‍या व्यक्तीविरोधात धडगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईनंतर संबंधितास न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली. विनाकारण यंत्रणेला वेठीण धरणार्‍यांना या कारवाईने आता चपराक बसणार आहे.

काय घडलं?

धडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पो. कॉ./प्रीहवक सुनिल पिंपरे हे 28 एप्रिल 2022 रोजी डायल 112 बिट मार्शल-2 वर ड्युटीवर असताना सायंकाळी 5.45 वाजता जिल्हा परिषद कात्री शाळेजवळ भाऊ त्रास देत असून शिवीगाळ करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Pune Traffic Police : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दंड न भरल्यास लायसन्स होणार रद्द

घटनास्थळी पोहोचल्यावर एक इसम सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांततेचा भंग करताना आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने स्वतःचे नाव नारसिंग बोंडा पराडके (32, रा. गौर्‍याचा कामोदपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे सांगितले. त्यानेच डायल 112 वर कॉल केल्याची कबुली दिली मात्र पोलिसांनी तपास केला असता कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असून विनाकारण पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने कॉल केल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अहवालानुसार संबंधिताने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध धडगाव पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित आरोपीस शिक्षा सुनावत डायल 112 सारख्या आपत्कालीन सेवांचा गैरवापर करू नये, असा स्पष्ट संदेश दिला आहे.

Exit mobile version