Download App

सामनातील मजकूर नडला, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाचा समन्स

  • Written By: Last Updated:

मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या एका प्रकरणात समन्स बजावले आहे. खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात दोघांविरोधात समन्स बजावण्यात आले आहे.

राहुल रमेश शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, आणि संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालयाने मानहानीचा खटला विचारार्थ स्वीकारला आणि या संदर्भात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. कोर्टाने यांना 14 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (court-summons-to-uddhav-thackeray-and-sanjay-raut-over-mp-rahul-shewale-case)

काय आहे प्रकरण…

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात बदनामी कारक मजकूर छापण्यात आला होता. या मजकुरावर खासदार राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेत दैनिकाचे संपादक खासदार संजय राऊत आणि मालक उद्धव ठाकरे यांच्या विरोधात न्यालयात धाव घेत मानहानीचा दावा केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे.

PM मोदींनी ज्यांचा उल्लेख केला, ते पसमांदा मुस्लिम आहेत तरी कोण? त्यांचा इतिहास काय?

याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहे.

 

Tags

follow us