Download App

वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत आरोग्य विभागाने दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले पुढील 12 दिवस…

Covid Cases in India :   भारतामध्ये कोविड आता एंडामिकच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढू शकतात. त्यानंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये कमी येईल. आरोग्य मंत्रालयाच्या ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. एंडामिकचा अर्थ हा आजार आपल्यामध्येच असेल परंतु त्याचा परिणाम जास्त धोकादायक नसेल. पण आजाराची काळजी घ्यावी लागेल.

सूत्रांच्या माहितीनुसार सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्यांची संख्या कमी आहे व ही संख्या कमीच राहणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ओमिक्रोन सब वॅरिअंट XBB.1.16 मुळे कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे.

पंकजा मुंडेंना पाथर्डी मतदारसंघ का खुणावतोय ?

भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 7,830 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. यानंतर कोरोनाची एकुण रुग्णसंख्या 4,47,76,002 एवढी झाली आहे. याआधी मंगळवारी 5,676 एवढ्या केसेस समोर आल्या होत्या. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेनुसार देशामध्ये 40,215 अॅक्टिव रुग्ण आहेत.

नाना पटोले म्हणाले, मविआच्या वाढत्या प्रभावानं विरोधक धास्तावले

आत्तापर्यंत एकुण 4,42,04,771 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. तसेच कोरनातून बरे होण्याचा दर 98. 72 टक्के एवढा झाला आहे. याच वेळी 16 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा 5,31,016 एवढा झाला आहे. आरोग्या मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मृत्यू दर 1.19 टक्के एवढा आहे.

Tags

follow us