पंकजा मुंडेंना पाथर्डी मतदारसंघ का खुणावतोय ?

  • Written By: Published:
पंकजा मुंडेंना पाथर्डी मतदारसंघ का खुणावतोय ?

अशोक परुडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) राजकारणात सक्रिय झाल्यापासून शेवगाव-पाथर्डी (Shegaon-Pathardi Assembly Constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा असते. आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे. याचे निमित्त ठरले पाथर्डीतील भारजवाडी येथील भगवानबाबांच्या नारळी सप्ताहाचे.

या सप्ताहानिमित्त वेगळे राजकीय चित्र दिसले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले. दोघांच्या भाषणावरून एकमेंकाचे मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर आता पंकजा मुंडे या पाथर्डी -शेवगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनी राज्यात आठ ते दहा मतदारसंघ आहे. तेथील कार्यकर्ते या मतदारसंघातून लढावे, असे आग्रह करतात. त्यात पाथर्डी-शेवगाव मतदारसंघ एक आहे. हा मतदारसंघ पंकजा मुंडेंना का खुणावतोय, अशा राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

मला कोणतीही क्लीनचीट मिळालेली नाही; अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले

पाथर्डी-शेवगाव मतदासंघात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मोनिका राजळे निवडून आल्या आहेत. २०१४ मध्ये मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर घुले यांचा ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. मागील निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार बदलला होता. त्या ठिकाणहून वंजारी समाजाचे प्रताप ढाकणे यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरविले होते. राजळे यांना ढाकणे यांनी चांगलीच टक्कर दिली होती. वंजारी समाजाचे हक्काची व्होट बँक आणि इतर ओबीसी समाज या मतदारसंघात आहे. या मतदारसंघातील शेवगाव तालुक्यातील मराठा समाजाचे प्राबल्य आहे. तर पाथर्डी तालुक्यात वंजारी व इतर ओबीसी समाज जास्त आहे.

असली वक्तव्यं आधी बंद करा.. अजितदादा नाना पटोलेंवर भडकले !

बीडच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यातील वंजारी समाज गोपीनाथ मुंडे यांना मानतो. त्यामुळे पंकजा मुंडे सांगतील त्याच उमेदवाराला भरघोस मते मिळतात. कोणतीही निवडणूक असली तरी येथे पंकजा मुंडे यांची सभा होत असते.

शेवगाव तालुक्यात १ लाख ९० हजार मतदार आहे. तर पाथर्डी तालुक्यात १ लाख ५० हून अधिक मतदार आहेत. पाथर्डीत ६० हून अधिक मतदार वंजारी समाजाचे आहेत. तर तितकेच मतदार मराठा समाजाचे आहेत. तीस हजारहून अधिक मतदार इतर समाजाचे आहे.

शेवगाव तालुक्यातही काही भागात वंजारी समाज आहे. पण पाथर्डीच्या तुलनेत कमी आहेत. वंजारी समाजाचा एक गठ्ठा मतदार हा भाजपची मोठी व्होट बँक आहे. शिवाय भाजपला मानणारा मराठा समाज मोठा आहे.

याबाबत येथील ज्येष्ठ पत्रकार उमेश मोरगावकर म्हणाले, पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघातून उभे रहावे, अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा मतदार ही येथे आहे. मुंडे यांनी येथून निवडून लढावी, अशी अनेकदा चर्चा होत असते. येथून दोन वेळा मोनिका राजळे या निवडून आल्या आहेत. अशा वेळी भाजप पंकजा मुंडेंना उमेदवारी देईल का हा प्रश्न आहे. त्यांनी उमेदवारी दिली तर मोनिका राजळे यांची भूमिका महत्त्वाची राहिल.

परळी मतदारसंघांमध्ये धनंजय मुंडे यांनी चांगलेच बसस्थान जमविले आहे. त्यामुळे येथून लढणे पंकजा मुंडे यांच्यासाठी धोक्याचे वाटत आहे. तसेच पंकजांनी जर आपला जिल्हा बदलला तर या बहिण-भावातील संघर्ष देखील कमी होईल, अशी या मागची भूमिका आहे. पंकजा मुंडे यांना पाथर्डी मतदारसंघ सुरक्षित वाटत असल्याने तो खुणवत असावा, असे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube