Nashik Crime: नाशिक हादरले! भर रस्त्यात उद्योजकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीचा सीईओ (Company CEO ) योगेश सुरेश मोगरे यांच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास २ अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने ८ ते १० वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. (Nashik Crime) फाळके स्मारक भागात मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेल्या आंगण हॉटेलसमोर ही धक्कादायक घटना घडली (Nashik […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (100)

Nashik Crime

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीचा सीईओ (Company CEO ) योगेश सुरेश मोगरे यांच्यावर गुरुवारी (दि.२३) रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास २ अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने ८ ते १० वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. (Nashik Crime) फाळके स्मारक भागात मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेल्या आंगण हॉटेलसमोर ही धक्कादायक घटना घडली (Nashik Police) असून हल्लेखोरांनी मोगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांचीच चारचाकी गाडी हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी ही चारचाकी वाडीवऱ्हे ते गोंदे दुमाला दरम्यान ताब्यात घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश मोगरे (३९, फ्लॅट नंबर ८६ कालीबारी सोसायटी, पाथर्डी फाटा) अंबड औद्योगिक वसाहतीतील रोहिणी इंडस्ट्रीज या कंपनीत सीईओ पदावर कार्यतर होते. ते गुरुवारी (दि.२३) सकाळी ८:३० वाजता नेहमीप्रमाणे कंपनीत (एमएच १५ एचवाय ४९५९) या कारने घेऊन गेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची गाडी त्रंबकनाका येथील सर्विस स्टेशनला सर्विस केल्यानंतर मोगरे त्यांच्या कंपनीचे कॉन्टॅक्टर सोनू कुहाडे यांच्यासमवेत कंपनीच्या कामानिमित्त डहाणू येथे गेले असताा योगेश मोगरे यांचे त्यांची पत्नी विजया यांच्यासोबत मोबाईलवर बोलणे झाले होते.

Actress Nilu Kohli यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास विजया यांना सोनू कुहाडे यांनी मोबाईलवरून योगेश मोगरे कंपनीतून घरी येत असताना त्यांच्यावर पांडवलेणी, फाळकेस्मारक भागात हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती दिली. या]नुसार आंगण हॉटेलसमोर दोघांनी त्यांच्यावर चाकूने छातीवर, मानेवर, हातावर, चेहऱ्यावर आठ ते दहा वेळा वार केले. त्यामुळे त्यांना औषधोपचारासाठी तत्काल खासगी रुग्णलायात दाखल करण्यात आले होते.

मात्र मोगरे हल्ल्यात गंभीर जखमी झालेले असल्याने शुक्रवारी (दि.२४) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास त्यांचा औषध उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणात इंदिरानगर पोलिस ठाण्यात योगेश मोगरे यांच्या पत्नी विजया मोगरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोरांनी योगेश मोगरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर त्यांची कारही पळवून नेली होती. ही कार रात्री १ वाजेच्या सुमारास गोंदे शिवारातील व्हीटीसी फाटा येथील बंद पडलेल्या कंपनी समोरील रस्त्यावर आढळून आली. गाडीतील इंधन संपल्याने हल्लेखोरांनी वाहन बेवारस स्थितीत सोडून पळ काढल्याची सांगितले जात आहे. या प्रकारचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version