Actress Nilu Kohli यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Actress Nilu Kohli यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

मुंबई : अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहली यांच्या पतीच निधन झालं आहे. हरमिंदर सिंह असं त्यांच्या पतीचं नाव असून त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. गुरूद्वाराहून आल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले होते. त्यावेळी ते तेथेच कोसळले. त्यांच्या घरातील हेल्परने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नीलू कोहली यांच्या पतीच निधन झालं आहे. ही माहिती त्यांची मैत्रीण वंदनाने दिली. त्यांनी सांगितलं की, हरमिंदर सिंह यांच्या घरी त्यांचा हेल्पर त्यांची लंचसाठी वाट पाहत होता. पण गुरूद्वाराहून आल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले होते. बराच वेळ ते बाथरूममधून बाहेर न आल्याने हेल्परने बाथरूमध्ये जाऊन बिघितले असता हरमिंदर तेथेच कोसळले होते. हेल्परने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्याचबरोबर अशी माहिती मिळत आहे की, हरमिंदर सिंह यांना मधुमेह होता. पण ते हेल्दी होते. अभिनेत्री नीलू कोहली अनेकदा त्यांच्या कुटुंबाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतात. त्यामध्ये हरमिंदर सिंह यांचे देखील फोटो असायचे. रविवारी हरमिंदर सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

WIPL 2023 Playoff : यूपीचा पराभव करत मुंबई इंडियन्सचा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश

दरम्यान अभिनेत्री नीलू कोहली यांच्या कामाबद्द सांगायचं झालं तर त्यांनी हाऊसफुल 2, पटियाला हाऊस, हिंदी मिडीअम यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube