Jain Muni Announces Shantidoot Party For Upcoming BMC Elections : मुंबईतील कबुतर खान्याचा प्रश्न चर्चेत असतानाच आता जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा या नव्यापक्षाची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, आगामीकाळात होऊ घातलेल्या मुंईत महापालिका निवडणुकीतही (BMC) पक्षाकडून उमेदवार दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पक्षाचे चिन्ह शांतीदून कबुतर असेल. येणाऱ्या काळात आमचा पक्ष फक्त कबुतरांसाठीच नव्हे तर, गोमातासह प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आमचा पक्ष काम करेल असेही जैन मुनी निलेशचंद्र यांनी यावेळी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज (11 ऑक्टोबर) जैन धर्मियांकडून (Jain Community) मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व जैनमुनींनी एकत्र पत्रकार परिषद घेत नव्या पक्षाची मोठी घोषणा केली.
कोण जैन लोक कबुतरावर बसून फिरायला जातात?; उंदराचं उदाहरण देत राज ठाकरेंनी नवी वात पेटवली
शिवसेना वाघावर चालू शकते तर, मग आमचा पक्ष कबुतरावर का नाही
कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल’, असं कबुतरांसाठीच्या धर्मसभेत जैन साधू निलेश मुनींनी इशारा दिला.कबुतरांविरोधात जे आहेत त्यांच्यांशी आमचा वाद आहे. हा पक्षफक्त जैनांचा पक्ष नाहीये. राजस्थान 36 कोम यात जेवढेपण मारवाडी गुजराती असेल ते सगळे एक होऊन आम्ही आमचे उमेदवार उभे करू असे जैन मुनींनी जाहीर केले. यावेळी त्यांनी शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना आवरण्याचेही आवाहन केले. शिनसेना वाघाच्या नावावर चालू शकते तरस जैन समाज शांतीदूतच्या नावावर पक्ष का नाही अस्तित्वात येऊ शकत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याला किती धोका; वाचा, डॉ. कल्याण गंगवाल नक्की काय म्हणाले?
पक्षात चारृदर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री
मी कोणत्याही पक्षाचा विरोधक नसून, महाराष्ट्रात मी फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांनाच मानतो. ज्यांनी फडणसांना मानले मी त्यांनाच मानतो असेही जैन मुनींनी सांगितले. बाकी कोणत्याच नेत्यांना ओळखत नाही. आमच्या जन कल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री असल्याचंही निलेश मुनी म्हणाले.
कबुतरांना दाणे टाकायचे असतील तर घराच्या टेरेसवर टाका; मनिषा कायंदेंनी आंदोलकांना ठणकावलं
शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना आवरावं
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदेंनाही निलेश मुनी यांनी यावेळी इशारा दिला. तसेच शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना आवरावे असे आवानही केले. निलेश मुनी म्हणाले की, कायदें ताई कोण आहेत त्यांना मी ओळखत नाही. पण, मी एकनाथ शिंदेंना सांगतो, त्या बिचाऱ्या पागल झाल्या आहेत, त्यांना आवरा असे निलेश मुनी म्हणाले. यावेळी कांद्यामुळे काँग्रेसचं,कोंबडीमुळे शिवसेनेचं सरकार गेलं, तसेच कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल’, असा इशाराही कबुतरांसाठीच्या धर्मसभेत निलेश मुनींनी दिला.