Jain Muni Criticize Chitra Wagh And Manish Kayande : मुंबईतील कबुतरखान्यांच्या (Dadar Kabutarkhana) परिसरात पक्ष्यांना खाद्य घालण्यावर उच्च न्यायालयाने कायम ठेवलेला मनाई आदेश आता नव्या वादाला तोंड फोडत आहे. या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झालाय. 13 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा (Mumbai News) देण्यात आला आहे. रविवारी दादर कबुतरखान्याबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain Muni) यांनी ठाम भूमिका मांडली.
कोणताही बॅनर लावलेला नाही
जैन धर्माचा प्रश्न आला, तर आम्ही न्यायालय आणि सरकारलाही जुमानणार नाही, असं निलेशचंद्र विजय यांनी स्पष्टपणे सांगितले. आंदोलनासाठी कायदेशीर तयारी म्हणून चार वकील वेगवेगळ्या न्यायालयात तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा मान ठेवायचाय. पण संविधानात लिहलंय की, 223 कलमात कोणत्या पक्ष्याला मारणं अपराध आहे.दादर कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांना खाणं टाकू नका, असा कोणताही बॅनर लावलेला नाही, असं देखील जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी स्पष्ट केलंय.
मांसाहार बंदी! कुणाच्या बापाचं राज्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा संताप, शिंदेंना ओपन चॅलेंज
चित्रा वाघ आणि मनीषा कायंदेवर टीका
या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे (Manish Kayande) यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. हा मुद्दा काढणाऱ्या या दोन नेत्या आहेत. चित्रा वाघ म्हणतात, कबुतरांमुळे त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला. मग त्यांना विचारा, दारू आणि कोंबडी खाऊन कितीजण मृत्युमुखी पडलेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शांतताप्रिय पण ठाम भूमिका
आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग निवडू. जैन समाज शांतताप्रिय आहे; शस्त्र उचलणे आमचे काम नाही. मात्र, धर्मरक्षणासाठी गरज पडल्यास शस्त्र हाती घेण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आम्ही संविधान, कोर्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मान ठेवतो, पण आमच्या धर्माविरोधात निर्णय घेतला, तर आम्ही न्यायालयालाही मानणार नाही,” या त्यांच्या वक्तव्यामुळे आता परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.