फडणवीसांचा गोव्यातून ‘दंगल प्लॅन’! मराठा नेत्यांना संपवण्याचा कट; जरांगे पाटलांनी दिला सतर्कतेचा इशारा

फडणवीसांचा गोव्यातून ‘दंगल प्लॅन’! मराठा नेत्यांना संपवण्याचा कट; जरांगे पाटलांनी दिला सतर्कतेचा इशारा

Manoj Jarange Patil Allegation On CM Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते वेगवेगळ्या शहरांत बैठका घेत आहेत. आज ते अहिल्यानगरमध्ये होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे जाणूनबुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत असून, प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचा दावा त्यांनी केला. जर प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत असेल, तर त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा राहीन, असे आश्वासन देखील मनोज जरांगे यांनी दिले.

मांसाहार बंदी! कुणाच्या बापाचं राज्य आहे का? जितेंद्र आव्हाडांचा संताप, शिंदेंना ओपन चॅलेंज

सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विचारले असता, फक्त शिंदे नव्हे, तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम फडणवीस करत आहेत, असा आरोप जरांगे यांनी केला. यासाठी प्रत्येक मराठा मंत्र्यासोबत फडणवीस यांनी त्यांच्या पसंतीचा ओएसडी नेमला असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीस हे आतल्या गाठीचे आहेत; त्यांनी नारायण राणे, एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांवरही डाव टाकला आहे. त्यामुळे सर्व मराठा मंत्री आणि नेत्यांनी सावध राहावे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

भाजपमध्ये ‘सडक से संसद तक’चा नवा अध्याय, पुण्यातील मंडलाध्यक्षांना थेट सर्वोच्च नेतृत्वाकडून धडे

गोव्यातून दंगल नियोजनाचा आरोप

जरांगे पाटील यांनी आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितलं की, फडणवीस यांनी गोव्यात ओबीसींचा मेळावा घेऊन मुंबईत येणाऱ्या मराठा मोर्चात दंगल घडवण्याचा कट रचला आहे. फडणवीस कोणाचंही काम पटकन करत नाहीत. मग तो गोरगरीब असो, ओबीसी असो किंवा मराठा. आता ते ओबीसींसाठी लढणार असल्याचं सांगत आहेत, पण मग मराठ्यांसाठी कोण लढणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईतल्या मोर्चात काही गडबड झाली, तर त्याची जबाबदारी फडणवीस यांचीच असेल, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.

ओबीसी मंत्र्यांवर निशाणा

ओबीसी मंत्र्यांवरही जरांगे यांनी तोफ डागली. जिथे ओबीसी मंत्री आहेत, तिथे भाजपचे मराठा कार्यकर्ते त्रास सहन करत आहेत. तिथले ओबीसी चिल्लर नेते येऊन विचारतात, तुम्हाला काम देऊ का? अशी परिस्थिती असेल तर पक्ष कसा वाढणार? असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला. ज्यांना त्रास होतो, त्यांची नावं मी भविष्यात सांगीन. पण जिथे मराठा पालकमंत्री आहेत, तिथे ओबीसींना त्रास होतो का? असा प्रतिप्रश्नही जरांगे यांनी उपस्थित केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube