माझ्या मुलीचे जसे टुकडे केले तसे राहुलचे करणार; दर्शनाच्या आई संतापल्या

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore)याला मुंबईमधून (Mumbai)अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी(Pune Rural Police) राहुल हंडोरेला अटक केली आहे. दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राहुलच्या अटकेनंतर दर्शनाचे कुटुंबिय चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. राहुलने माझ्या बहिणीचा घात केलाय त्यामुळे त्याला आमच्या […]

Darshana Pawar Sunanda Pawar Rahul Handore

Darshana Pawar Sunanda Pawar Rahul Handore

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore)याला मुंबईमधून (Mumbai)अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी(Pune Rural Police) राहुल हंडोरेला अटक केली आहे. दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राहुलच्या अटकेनंतर दर्शनाचे कुटुंबिय चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. राहुलने माझ्या बहिणीचा घात केलाय त्यामुळे त्याला आमच्या ताब्यात द्या नाहीतर मारुन टाका अशा संतप्त भावना दर्शनाच्या भावाने व्यक्त केली. त्याचबरोबर माझ्या मुलीचे जसे टुकडे केले तसे त्याचे मीट टुकडे करते, मला तिथे घेऊन चला, अशी संतप्त प्रतिक्रिया मृत दर्शनाच्या आई सुनंदा पवार
(Sunanda Pawar)यांनी व्यक्त केली आहे. (darshana-pawar-murder-case-rahul-handore-arrested-mother-and-brother-reaction)

MPSC टॉपर दर्शनाच्या हत्येचं गुढ उकललं; बेपत्ता मित्र हांडोरेला मुंबईतून अटक

दर्शनाच्या आई म्हणाल्या की, मला मुंबईला घेऊन चला, माझ्या दर्शनाचे जसे तुकडे केले तसेच त्या राहुलचे तुकडे मी करते. मी एकटीच तुकडे करीन मला कुणाचीच मदत नको. माझ्या मुलीची हत्या केली तशीच त्याची हत्या करायची आहे. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि मीच देईन तो न्याय. राहुल हांडोरेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

Darshna Pawar Murder Case :आधी मध्यप्रदेश, कोलकाता नंतर चंदीगड असा लागला दर्शनाच्या मारेकऱ्याचा तपास

तो जिवंत राहायला नको. आणखी दहा मुलींचं पुढं नुकसान व्हायला नको. माझी मुलगी गेली तशी इतर कुणाची मुलगी जाऊ नये. त्यामुळे राहुल हांडोरेला फाशीच झाली पाहिजे अशी संतप्त मागणी दर्शनाच्या आईने केली आहे.

त्याचवेळी दर्शनाचा भाऊ म्हणाला की, राहुल हांडोरेला आमच्या ताब्यात द्या नाहीतर मारुन टाका. त्याला जिवंत सोडता कामा नये. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला खूप त्रास झाला आहे. त्याला मारा नाहीतर आमच्याकडे द्या एवढीच विनंती सरकारकडं आहे, अशी संतप्त भावना यावेळी दर्शनाच्या भावाने व्यक्त केली आहे.

Exit mobile version