MPSC टॉपर दर्शनाच्या हत्येचं गुढ उकललं; बेपत्ता मित्र हांडोरेला मुंबईतून अटक
Darshana Pawar Murder Case Update : MPSC टॉपर दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शनाचा बेपत्ता असणारा मित्र राहुल हंडोरेला याला पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राहुलला अटक करण्यात आल्याने आता दर्शनाच्या हत्याचे गुढ उकलण्यास मदत होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार दर्शनाची हत्या केल्याची कबुली राहुलने दिल्याची माहिती आहे. (Rahul Handore arrested in Darshana Pawar murder case)
पोस्टमॉर्टममधून धक्कादायक खुलासे
एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. या घटनेनंतर दर्शनासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता होता. त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. ज्यात दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे अहवालामध्ये नमुद करण्यात आले होते. घडलेल्या घटनेमागे प्रथमदर्शनी संशयाची सुई दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याच्यावर होती. मात्र, तो घटनेच्या दिववसापासून सध्या बेपत्ता होता. त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 पथकं तयार केली होती. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
राष्ट्रवादीला ठोकला रामराम; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा बीआरएसमध्ये प्रवेश
दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. यंदाच्या एमपीएससीच्या निकालामध्ये तिचा तिसऱ्या क्रमांक आला होता. वन अधिकारी म्हणून तिला पोस्ट मिळाली होती. दर्शना दत्तू पवार हिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. याबाबतचा अहवाल आता पोलिसांना प्राप्त झाला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत.
फुटेजमध्ये एकटाच दिसून आला होता राहुल
दरम्यान, दर्शनासोबत राहुल हा देखील राजगडावर गेला होता. त्यानंतर पोलिसांच्या हाती आलेल्या CCTV फुटेजमध्ये राहुल एकटाच खाली येताना दिसून आला. त्यामुळे दर्शनासोबत ट्रेकिंगसाठी गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरेवर तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
…म्हणून हत्या केल्याचा संशय
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखतात. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. परंतु नात्यात असल्यामुळे पवार कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. घरच्यांनी तिचं इतरत्र लग्न ठरवलं होतं. दर्शनाने नुकतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. तर दुसरीकडे राहुल मात्र परीक्षेत अपयशी झाला होता. त्यातच लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याच्या रागातूनच राहुलने दर्शनाची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.