Darshna Pawar Murder Case :आधी मध्यप्रदेश, कोलकाता नंतर चंदीगड असा लागला दर्शनाच्या मारेकऱ्याचा तपास

Darshna Pawar Murder Case :आधी मध्यप्रदेश, कोलकाता नंतर चंदीगड असा लागला दर्शनाच्या मारेकऱ्याचा तपास

Darshna Pawar Murder Case : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. यंदाच्या एमपीएससीच्या निकालामध्ये तिचा तिसऱ्या क्रमांक आला होता. वन अधिकारी म्हणून तिला पोस्ट मिळाली होती. ( Rahul Hundore Expose Reasone Behind Darshana Pawar Murder Case After Aarested )

‘अजितदादांचं काम उत्तमच पण, इतरांनी काही’.. राऊतांनी काँग्रेसला दिला इशारा

अखेर दर्शनाच्या हत्या करणाऱ्याला अटक :

त्यानंतर आता दर्शनाचा मित्र आणि संशयित आरोपी राहुल हांडोरे याला अटक करण्यात आली आहे. दर्शना राजगडावर गेली तेव्हा तिच्यासोबत राहुल होता. मात्र गडावरून परत येताना तो एकटाच होता. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला तेव्हापासून राहुल फरार होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होती. तर आता त्याला ताब्यात घेतलं आहे.

कसा लागला राहुलचा तपास :

दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फारार झाला. तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत होता. आधी मध्यप्रदेश, नंतर कोलकात्यात होता. तर कधी तो चंदीगडमध्ये होता. त्यामुळे त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना नाशिकवरून त्याच्या नातेवाईकांना पुण्यात आणलं होतं. त्यांच्या मार्फत पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. कारण त्याचं मोबाईल लोकेशन कळेल. तो वेगवेगळ्या सिम कार्डवरून तो घरच्यांना संपर्क साधत होता. त्याचे पैसे संपल्याने तो घरच्यांकडे पैसे मागत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरच्यांनी त्याला पैसे देखील पाठवयाल लावत होते. जेणेकरून त्याने एटीएमने पैसे काढल्यास त्याचे लोकेशन ट्रॅक केले जाईल.

राहुलने दर्शनाच्या हत्येचं कारण :

राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा गावचा आहे. दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक होते. ते दोघेही पुण्यात राहून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र यामध्ये दर्शनाला आधी यश मिळालं. तर ती वन विभागात अधिकारी होणार होती. त्यामुळे राहुलला वाटलं आता आपली ही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

यामध्ये तो दर्शना आणि तिच्या घरच्यांना आणखी वेळ मागवून मागत होता. जेणे करून तो पुढची परीक्षा पास होऊन अधिकारी बनेल. मात्र ते लोक त्याला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्याने तिची हत्या केली. सुरूवातीला तो गुन्हा कबुल करत नव्हता मात्र अखेर त्याने गुन्हा कबुल केला आहे. तर त्याला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube