‘दबावाला भीक घालणारा नाही, आम्ही मराठ्याची अवलाद अन् शेतकऱ्यांची मुलं’; दादांनी ठणकावून सांगितलं

कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाहीत, मराठ्याची अवलाद अन् शेतकऱ्यांची मुलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावूनच सांगितलं आहे. कोल्हापुराती आयोजित प्रत्युत्तर सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर? अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत […]

Ajit Pawar

Ajit Pawar

कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाहीत, मराठ्याची अवलाद अन् शेतकऱ्यांची मुलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावूनच सांगितलं आहे. कोल्हापुराती आयोजित प्रत्युत्तर सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर?

अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत गेल्यापासून विरोधकांकडून दबावाखाली गेले असल्याची सतत टीका केली जात आहे, पण आम्ही कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाहीत, मराठ्याची अवलाद आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत , जे बदनामी करण्याचं काम चाललंय त्यामध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

थोरातांचा इशारा, विखेंचा अ‍ॅक्शन मोड! ‘निळवंडे’च्या पाण्याचे ‘शेड्यूल’च सांगितले

तसेच मी जे बोलतो ते खरं बोलतो, नूसती भाषणात सांगून तरुणांच्या हाती काम मिळत नाही, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी महायुतीमध्ये आम्ही गेलो नाही, काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोकांच्या कामांचा दबाव असतो आमच्यावर तो दबाव होता, म्हणूनच आम्ही महायुतीसोबत गेलो असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी केलं आहे.

…तर राजकारणातून निवृत्ती घेईन :
काही जण आमची बदनामी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे सरकार पडत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. ते आमच्या नेत्यांना दिले होते. तेव्हा महायुतीत जायचे होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. मी बोलत आहे हे खोटे असेल, तर राजकारणातून निवृत्ती होईल. आहे कुणाची तयारी. खरे असेल तर जे खोटे बोलतात. त्यांनी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे, असे थेट चॅलेंजही अजित पवार यांनी दिले आहे.

नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं! बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद यात्रा’

आमचे सर्व सहकारी लोकांचे कामे करणारी आहेत. माझा दिवस सकाळी 6 वाजता सुरु होतो, रात्री 11 वाजता संपतो,लोकांना दिलेला शब्द आम्ही पाळतो, विरोधकांना नूसत्या ढूसण्या देणं हे आमचं काम नाही, लोकशाहीत टीका करणं हा हक्क विरोधकांना आहे, कोणीही उठतंय अन् उचलली जीभ लावली टाळ्याला, या शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=rlwffoiEfxw

दरम्यान, राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हीच सरकारची भूमिका असून त्यावर तोडगा काढण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री सर्वच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहुन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version