‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर?
हसन मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही, या शब्दांत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना सुनावलं आहे. राष्ट्रवादीची प्रत्युत्तर सभा आज कोल्हापुरात पार पडली. या सभेतून धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात शरद पवार गटाची सभा पार पडली. या सभेआधी रोहित पवारांनी कोल्हापुर दौरा करत हसन मुश्रीफांवर सडेतोड भाष्य केलं होतं. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांवर रोख ठेवला होता.
‘एकनाथ शिंदे बेकायदा मुख्यमंत्री’; दिल्ली दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंनी धू-धू धुतलं…
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी कोल्हापुरात सभा घेतली. या सभेतून शरद पवार गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. त्यानंतर आज अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी टीका करताना रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे म्हणाले, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत नव्याने जन्माला आलेलं नेतृत्व कोल्हापुरच्या पैलवानांना आव्हान करतंय, हसन मुश्रीफ यांना पायथानाची भाषा करीत आहे, त्यांना एकच सांगणं आहे, मुश्रीफांनी तुम्हाला प्रेमाने मिठी मारली तरी तुमच्या बरगड्या राहणार नाहीत, अशी सडकून टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
चंद्रयान-2 ने घेतला चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचा फोटो, ‘चंद्रावरच्या अंधारात कैद झाले सुंदर दृश्य’
तसेच राष्ट्रवादीच्या नव्या उदयास आलेल्या नेत्यांकडून संस्कारहीन बोलणं सुरु आहे, त्यांना साहेबांनी हेच शिकवलंय का? काय शिकवावं, ज्यांनी पायथानांची भाषा केलीयं, त्यांना धनंजय मुंडे यांनी एक प्रकारे इशाराचं दिल्याचं दिसून आलं आहे.
रस्त्यांसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको; आ. तनपुरेंचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
रोहित पवारांवर नाव न घेता टीका केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना मुंडे यांनी शेरोशायरी करीत शरद पवारांबद्दल आदरही व्यक्त केल्याचं दिसून आलं आहे. मुंडे म्हणाले, “हमारी कोई खता तो साबित कर… बुरे है तो बुरा साबित कर… तुझे चाहा है कितना ये तु क्या जाने…. चल हम बेवफाई सही… तु अपनी वफा तो साबित कर!” अशी शेरोशायरी धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर केली आहे.
‘ही वेड्यांची पैदास…’; IIT मंडीच्या संचालकांवर आव्हाडांचे टीकास्त्र
तसेच साहेबांनी जीव द्यायला लावला असता तर दिला असता पण लोकशाही न मानता फक्त काही लोकांचा मतदारसंघ सांभाळण्यासाठी तुम्ही हे केलंत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तुम्ही मुश्रीफांना बदनाम करण्याचं काम केलं हे दुर्देव, असल्याचं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफांचे चिरंजीव बीडचे जावई आहेत, कोल्हापुरात तुम्ही ऊस पिकवणाऱे शेतकरी आणि आम्ही तुमचा ऊस तोडणारे ऊसतोड कामगार, असं आमचं नातं आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर प्रसंग येणार असल्याचं विधान त्यांनी केलं, साखरेवर कसला तरी कर लागणार आहे, असंही ते म्हणाले, पण साखरेचा भाव उतारावर ठरवला जातो, केंद्राच्या आयात निर्यातीवर नाही, असं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.