‘ही वेड्यांची पैदास…’; IIT मंडीच्या संचालकांवर आव्हाडांचे टीकास्त्र
Jitendra Awhad on Laxmidhar Behra : IIT मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behra) हे कायम अजब विधानं करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आम्ही पित्र मंत्राच्या जपाद्वारे आमच्या अपार्टंमेटमधून वाईट आत्मांना पळवून लावलं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या अकेलेचे तारे तोडले. लोकांचं मांसाहार करण्याचं प्रमाण वाढल्यानं हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत, असा विधान त्यांनी केलं. दरम्यान बेहरा यांच्या या वक्तव्याचा आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून बेहरा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी थोडक्याच तीन शब्दांची प्रतिक्रिया देत आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांना फटकारले. ही वेड्यांची पैदास, असं ट्विट आव्हाड यांनी केलं. त्यांचं हे ट्वीट व्हायरल होत आहे.
ही वेड्याची पैदास…. pic.twitter.com/17CfnXDmD9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 8, 2023
हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. भूस्खलनाच्या घटना का वाढल्या? तज्ज्ञांकडून त्याची पाहणी करण्यात आली असून त्यावर अभ्यासही सुरू आहे. अशातच आयआयटीच्या संचालकाने अजब दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले बेहरा?
आपण हिमाचल प्रदेशात राहतो, जर इथं लोक मांसाहार करत राहिले तर हिमाचल प्रदेशात आणखी घटना घडतील. तुम्ही निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. त्याचा संबंध पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी आहे. तुम्ही ते पाहू शकत नाही, पण त्याचा परिणाम होतोत असं विधान बेहरा यांनी केला. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Dhangar Reservation : फसवणूक केली तर समाज धडा शिकवणारच; वडेट्टीवारांनी भाजपला घेरलं
हिमाचल प्रदेशात वारंवार भूस्खलन, ढग फुटी आणि इतर ज्या नैसर्गिक समस्या येत आहेत. ते सगळं प्राण्यांवरच्या क्रुरतेचे परिणाम आहेत. लोक मांसाहार करतात. त्यामुळं अशा समस्या ओढवतात. चांगला माणूस बनण्यासाठी लोकांना मांस खाणे बंद केले पाहिजे, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घ्या, असं आवाहनही केलं.
आयआयचीच्या वेबसाइटनुसार, लक्ष्मीधर बेहरा आयआयटी दिल्लीमधून पीएचडी आणि जर्मन नॅशनल सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून पोस्ट-डॉक्टरेट पदवी घेतली आहे. ते रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील तज्ञ मानला जातात. एवढं उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी असं वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. बेहरांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. अनेकांनी बेहरा यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. .