Dhangar Reservation : फसवणूक केली तर समाज धडा शिकवणारच; वडेट्टीवारांनी भाजपला घेरलं

Dhangar Reservation : फसवणूक केली तर समाज धडा शिकवणारच; वडेट्टीवारांनी भाजपला घेरलं

Dhangar Reservation : मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचाही (Dhangar Reservation) मुद्दा चर्चेत आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने भंडारा टाकल्याची घटना सोलापुरात घडली. यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकारवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

वडेट्टीवार म्हणाले, 2014 मध्ये भाजप (BJP) सरकारने धनगर आरक्षणाचे (Dhangar Reservation) आश्वासन दिले होते. पण आश्वासन काही पूर्ण केले नाही. धनगर समाजाची मतं घेतली, त्यांना फसवण्याचं काम केलं. समाजाला जर फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज याम माध्यमातून धनगर समाजाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आता तरी समाजाच्या भावनांचा विचार केला पाहिजे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे तुमचंच सरकार आहे. त्यामुळे कुणाला काय द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. तुमची नियत साफ असेल तर नक्कीच काम होईल. अन्यथा जनता फसवणूक करणाऱ्यांना सोडणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

विखेंवर भंडारा उधळल्यानंतर लाथाबुक्यांखाली तुडवलेला शेखर बंगाळे कोण?

मंत्री विखे पाटलांवर टाकला भंडारा

सोलापूरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना आज घडली. शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने हा भंडारा उधळण्यात आला. सोलापूरचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलपूरमध्ये गेले असताना ते लोकांचे निवेदनं स्विकारत होते. धनगर आरक्षण कृती समितीच्या काही लोकांनी त्यांची भेट घेतली. त्यांना धनगर आरक्षणासाठी निवेदन त्यावेळी तेथे त्यातील एकाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा टाकला.

धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न अनुत्तरीत – पाटील

दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्ष 2014 मध्ये सत्तेत आला. त्यावेळी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेऊ असे आश्वासन धनगर समाजाला दिले. मात्र धनगर आरक्षणाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे, असे जयंत पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

Radhakrishna Vikhe : माझ्यावर पवित्र भंडारा उधळणाऱ्यांवर कारवाई…; सोलापुरातील प्रकारावर विखेंची प्रतिक्रिया

follow us
  • fb
  • instagram
  • youtube