विखेंवर भंडारा उधळल्यानंतर लाथाबुक्क्यांखाली तुडवलेला शेखर बंगाळे कोण?

  • Written By: Published:
विखेंवर भंडारा उधळल्यानंतर लाथाबुक्क्यांखाली तुडवलेला शेखर बंगाळे कोण?

सोलापूर : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विखे पाटलांना निवेदन देण्यात आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा (Bhandara) उधळण्यात आला. यानंतर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विखेंच्या अंगावर अशाप्रकारे भंडारा टाकणारा शेखर बंगाळे नेमका कोण आहे हे आपण जाणून घेऊया. (Bhandara Thrown On Vikhe Patil know Who Is Shekhar Bangale)

Maratha Reservation : आंदोलनाचे यश नजरेच्या टप्प्यात; आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये

विखेंवर भंडारा उधळणारे शेखर बंगाळे कोण?

बंगाळे यांच्याकडून निवेद स्विकारल्यानंतर विखे ते वाचत असताना बंगाळे यांनी त्यांच्या खिशातून एक पुडी बाहेर काढत त्यातील भंडारा विखेंच्या डोक्यावर टाकला. तसेच घोषणाबाजीदेखील केली. त्यानंतर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांकडून बंगाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. बंगाळे याने अशाप्रकारे भंडारा उधळण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी बंगाळे याने भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावरदेखील भंडारा उधळण्याचे धाडस केले आहे.

Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघ नख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका

शेखर बंगाळे हा सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता असून, विद्यापीठाच्य नाम विस्तारावेळी तो प्रकाशझोतात आळा होता. जेव्हा तल्कालीन शिक्षण मंत्री तावडे सोलापूरला आले होते. त्यावेळी बंगाळे याने हुतात्मा स्मृती मंदीर येथे तावडे यांच्यावर भंडारा उधळला होता. याशिवाय अनेक कारणांमुळे बंगाळे हा नेहमीच चर्चेत असतो.

शासकीय विश्रामगृहात नेमकं काय घडलं? 

अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असून याच मुद्द्यावर विखे पाटलांना भेटण्यासाठी आणि निवेदनदेण्यासाटी काही कर्यकर्ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. यात धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा आणि धनगर कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळेंचा समावेश होता. यावेळी बंगाळे यांनी विखे पाटलांना निवेदन दिले. ते वाचत असताना अचानक बंगाळेने त्याच्या खिशातील पुढी बाहेर काढली आणि विखेंच्या डोक्यावर भंडारा उधळला. धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने हा भंडारा उधळून संताप व्यक्त करण्यात आल्याने हा प्रकार घडला. यानंतर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांकडून बंगाळेला लाथाबुक्क्यांनी मारहार करण्यात आली.

हवं तर ‘भारत’ नाव आम्ही घेतो पण, जनतेच्या डोक्यावर.. सुळेंनी मोदी सरकारवर सुनावलं

शासनानने धनगर समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही सोलापूरमध्ये पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेलो होतो. यावेळी आम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावं आणि ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. अशी मागणी केली. तसेच यापुढे आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना काळ देखील फासण्यात येईल असा इशारा यावेळी धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी दिला आहे.

घडलेल्या प्रकरणावर काय म्हणाले विखे पाटील?

सोलापूरमध्ये विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. या प्रकारावर ट्विट करत मंत्री विखे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच…भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको. धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील!’ असं म्हणत त्यांनी भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube