Download App

“तुम्ही माझी भावकी… सरकारला माझंही तिसरं इंजिन : अजितदादांची केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा

नाशिक : “भारतीताई पवार, तुम्ही माझी भावकी आहात. तुम्ही म्हणाला, राज्यात दोन इंजिनचं सरकार आहे. पण दोन नाही आता माझं पण तिसरं इंजिन लागलं आहे, अशी फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणात सुधारणा केली. ते आज नाशिकमध्ये “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. (DCM Ajit Pawar talk on Shasan Aaplya Dari event in Nashik district on fund allotment)

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

अजित पवार म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी पावासाने ओढ दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी लांबली आहे, तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. मात्र 17 तारखेपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पण यानंतरही जरी कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. वेळ पडल्यास केंद्र सरकारकडे जाऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

यापूर्वी लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला ‘शासन आपल्या दारी’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे. यापूर्वी नागरिकांना, विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे माराव्या लागत होते. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहचत नव्हती. मात्र आता ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून घरघरात योजना पोहचत आहेत, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. तसंच जिल्ह्यात आतापर्यंत 112 शिबिरे झाली असून तब्बल 11 लाख लोकांना फायदा झाला आहे. यात आदिवासी बांधव, ओबीसी, अल्पसंख्याक बांधवाना अधिकाधिक मदत मिळाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितलं.

नाशिकला निधी कमी पडू देणार नाही :

यावेळी अजित पवार यांनी त्यांच्यावर सातत्याने निधी न देण्याच्या होणाऱ्या टीकेवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कोणत्याही भागाला निधी कमी पडू देणार नाही. कुठेही जातीपातीच, धर्माचं, नात्यागोत्याचं राजकारण होणार नाही.

शिवसेना-भाजपच्या नाराज आमदारांना फडणवीसांचा शब्द अन् अजितदादांच्या ‘अर्थ’चा मार्ग झाला मोकळा

तसंच नाशिक जिल्ह्यातील अनेक कामांना गती दिली जाणार आहे. यात नाशिकला झोपटपट्टीमुक्त करणं, त्याचबरोबर नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या गोदावरीला प्रदूषण मुक्त करणं, रिंग रोडच्या कामाला गती दिली जाणार आहे. याशिवाय अनेक दिवसांपासून रखडेलला नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. यासाठीची बैठक पार पडली असून या प्रकल्पामुळे अहमदनगरसह नाशिक जिल्ह्याचा विकास होणार आहे, असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला.

Tags

follow us