Ajit Pawar : आजपासून मंत्रालयाच्या परिसरात ‘टेक वारी’ (Tech Wari) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. हा कार्यक्रम ५ मे पासून ते ९ मे पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) आणि प्रेरणादायी वक्ते गौर गोपालदास (Gaur Gopaldas) यांच्या हस्ते झालं. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे कान टोचले.
अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे निधन; शांताबाई साठेंनी वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या कार्यक्रम उद्घाटनासाठी रोबोटने अजित पवारांना कात्री दिली. त्याचा संदर्भ देत नीट काम करा, नाहीतर तुमच्या जागी रोबोट येईल, असा चिमटा त्यांनी काढला.
टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक कार्यक्रमाचे अजित पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभागाने आयोजित केलेला ‘टेक वारी’: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ हा उपक्रम राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशासकीय क्षमता विस्तारण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपाल दास यांच्या मार्गदर्शनाचा फायदा सर्वांनाच होईल.
Sugarcane FRP : वाढलेली एफआरपी कोणाच्या खिशात जाते ?
पुढं ते म्हणाले, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज्, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स ‘तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तन’ ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’, विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ अशा क्षेत्रातील तज्ज्ञ विविध मार्गदर्शन सत्रांद्वारे हे विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहेत. काळानुरूप बदल सगळ्यांनी स्वीकारून प्रशासन अधिक गतिमान करावे, असे आवाहन पवार यांनी व्यक्त केले.
टॅावेल आकाराची शाल दिली नसती तरी चाललं असतं…
यावेळी अजित पवारांनी टॉवेल, शाल, मिसळ, कात्री आणि रोबोट यावरून जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रम चांगला होत असताना यात काटकसरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जे सत्कार केले, त्यामध्ये शाल ही टॉवेलपेक्षाही कमी आहे. स्वागतावेळी टॅावेल आकाराची शाल दिली नसती तरी चाललं असतं. केवढी काटकसर…गौर गोपालदास यांना जी शाल दिली, ती शाल किमान त्यांचं अंग झाकेल एवढी तरी द्यायची, असं अजित पवारांनी म्हणताच मंत्रालयाच्या प्रांगणात एकच हशा पिकला.
मंत्रिमंडळ बैठकीवेळी आहाराचा विचार व्हायला हवा. फक्त मिसळच दिली जाते. आता मी सुजाता सौनिक यांना सांगणार आहे की, पुढच्यावेळी आहाराची जबाबदारी व्ही. राधा यांना द्या, असंही अजित पवार म्हणाले.
मी कार्यक्रमाला आलो तर आज वेळेत कात्री मिळाली. नेहमी कात्री शोधावी लागते. पण, आज रोबोटने बरोबर कात्री आणून दिली. बघा किती बरोबर काम रोबोट करतोय ते. त्यामुळे तुम्ही पण नीट काम करा. नाहीतर तुमच्या सगळ्यांची जागाही रोबोटच घेईल, असं ते म्हणाले.
यावेळी प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर.विमला, प्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यासह ज्येष्ठ सनदी अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.