Download App

श्रीकांत शिंदेंसह शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार? फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

Devendra Fadanvis : ‘ही गोष्ट निश्चित आहे की, कल्याण-डोंबिवलीच्या लोकसभेच्या जागेवर श्रीकांत शिंदेच लढणार आहेत. हे आमच्या नेत्यांना देखील माहिती आहे. त्यावर श्रीकांत शिंदेंना विचारले असता. ते म्हणाले की, कोणी दुसरं त्या जागेवर लढणार असेल तर मी राजीनामा देईल. मान्य आहे या गोष्टी बाहेर नाही यायला पाहिजे. मात्र काही गैरसमज त्यावेळी झाले होते.’ असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिले. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीसह शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार यावर फडणवीसांच्या या वक्तव्याने शिक्कामोर्तबच झालं आहे. (DCM Devendra Fadanvis expose about loksabha seat of Shrikant shinde and other Shivsena MP )

शिंदेंना सोडून अजितदादांना सोबत घ्यायचा प्लॅन होता का? काय म्हणाले फडणवीस

पुढे फडणवीस म्हणाले की, स्थानिक पातळीवर कधी-कधी समस्या निर्माण होतात. कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी नेत्यांना बोलावं लागत. तेच कल्याणला भाजपच्या झालेल्या बैठकीत झालं. कार्यकर्त्यांनी मागणी केली की, कल्याण-डोंबिवली लोकसभेची जागा भाजपकडे असावी. आमच्या नेत्यांनी देखील कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीची जागा भाजपच लढणार असल्याचं म्हटलं. मात्र यापेक्षा वास्तविकता वेगळी असते. कार्यकर्यांची मागणी ही चुकीची नसते.

TISS मोठा दावा : हिंदी चित्रपटसृष्टीतील ’72’ टक्के व्यक्तिरेखा पुरूष व्यक्तींनी साकारल्या, तर समलिंगींनी…

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात लढणार आहोत. हे नक्की आहे. पण यावर देखील पक्षाला काही वेगळा निर्णय घ्यायाचा असेल तर ते घेतील. मात्र त्याबद्दल मी सांगू नाही शकत. तसेच आमच्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये कोणतेही मतभेद नाही. असं देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?

मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभेच्या जागेबद्दल वक्तव्य केले होते. श्रीकांत शिंदे म्हणाले होते की, कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव झाला अशी चर्चा आहे. त्यामुळे युतीमध्ये कल्याणच्या जागेवरून वितुष्ट येणार असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार आहोत. तसेच यावेळी त्यांनी डोंबिवलीमध्ये स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी भाजपवर केला होता. मात्र आता फडणवीसांकडून यावर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी मुलाखतीत विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्याची सडेतोड उत्तरे यावेळी त्यांनी दिली.

Tags

follow us