शिंदेंना सोडून अजितदादांना सोबत घ्यायचा प्लॅन होता का? काय म्हणाले फडणवीस

शिंदेंना सोडून अजितदादांना सोबत घ्यायचा प्लॅन होता का? काय म्हणाले फडणवीस

Devendra Fadanvis On Ajit Pawar :  राज्याच सत्ता संघर्षाच्या निकालावेळी भाजपची अजित पवारांसोबत बोलणी सुरु असल्याची चर्चा होती. अजित पवार भाजपसोबत येणार असल्याचे बोलले जात होते. त्यावर भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिले आहे. सत्ता संघर्षाच्या निकालावेळी भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोडून विरोधी पक्षनेते अजित पवारांना आपल्याबरोबर घेणार असल्याच्या चर्चांवर फडणवीसांनी निकाल आमच्या बाजून लागणार याची खात्री होती असे म्हटले आहे. यावेळी ते रिपब्लीक भारत या वृत्त वाहिनीशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले की,  “ज्या कोणत्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाची माहिती आहे, ज्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा अभ्यास केलेला आहे, त्यांना ही गोष्ट माहिती आहे की, सर्वोच्च न्यायालय कधीच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही. आमदारांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायलय करु शकत नाही. ते सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांना देणार, हे सर्वांना माहिती होते. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्लॅन बी ची गरज नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले”.

पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा

ते पुढे म्हणाले की,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार प्रमुख असल्याने अजित पवारांशी चर्चा करुन कोणताही फायदा नाही. निकाल आमच्या बाजूने येणार याबाबत आम्हाला आत्मविश्वास होता. त्यामुळे आमची शरद पवार व अजित पवार यापैकी कुणाशीही बोलणे झाले नाही, असे फडणवीसांनी सांगितले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणताही बॅकअप प्लॅन तयार केला नव्हता. आम्हाला बॅकअप प्लॅन तयार करण्याची काहीही गरज नव्हती. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहे. त्यांनी जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर त्यात अडचण काय आहे. ते आम्हाला सर्वांसमोर भेटतात. ते आमच्यावर टीका करतात, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षांमध्ये संवाद होत असतो.

विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

दरम्यान, कालच माझे शरद पवार यांच्याशे बोलणे झाले. त्याआधीदेखील माझे त्यांच्याशी बोलणे झाले. आमच्यामध्ये संवाद होत असतो. शरद पवारांनी मला स्वत: फोन केला होता. आम्ही जवळपास 10 मिनीट बोलत होतो. महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षातीन नेत्यांचा एकमेकांशी संवाद होत असतो, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube