Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या खातेवाटपात छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं. तेव्हापासून छनग भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. मंत्रिपद कुणामुळे मिळालं नाही याचा थेट खुलासा त्यांनी केला नसला तरी त्यांचा रोख राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आहे हे आता लपून राहिलेलं नाही. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. यातच आज छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ या दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती भुजबळांनी माध्यमांना दिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझी भुजबळांशी भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितलं की आमच्यात काय चर्चा झाली. भुजबळ महायुतीमधील प्रमुख नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचाही मोठा वाटा आहे. अजित पवार देखील त्यांची काळजी करतात.
Ajit Pawar : शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
भुजबळांना मंत्रिमंडळात मंत्रिपद नाकारलं गेलं पण यामागे त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता हे अजित पवार यांनी मला सांगितलं होतं. आमचा पक्ष राष्ट्रीय राहिला आहे. आता आम्हाला पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करायचा आहे. त्यासाठीच भुजबळांसारख्या नेत्याला आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं होतं असं अजित पवार मला म्हणाले होते असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं बऱ्याचशा गो्ष्टी मी वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. आपण मान्य केलं पाहिजे की महायुतीला जो विजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळं लाभलं. त्यांचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आभार मानले पाहिजे. त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मला आहे. त्यांचे नुकसानही होऊ देणार नाही.
पण आता राज्यात जे काही सुरू आहे. वेगळं वातावरण आहे. आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू. राज्यातील ओबीसी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही निरोप द्या की मी यावर विचार करतोय. शांततेनं घ्या. दहा बारा दिवसांत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
छगन भुजबळ फडणवीसांत पाऊण तास खलबतं, भुजबळ म्हणाले, आठ ते दहा दिवसांनंतर..