Devendra Fadnavis : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली होती. त्यासाठी निधी वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. 17 तारखेपर्यंत राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यात निधी जमा होणार आहे. त्यानंतरही जे अर्ज येताहेत येतील त्यावर कार्यवाही करून त्याही बहिणींच्या बँक खात्यात निधी जमा करणार आहोत, अशी महत्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. फडणवीस यांनी आज नागपुरात ध्वजारोहणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत माहिती दिली. तसेच ही योजना पुढेही सुरुच राहिल अशी ग्वाही दिली.
Maratha Reservation: फडणवीस एकटे पडलेत! निवडणुकांसाठी कागदपत्र तयार ठेवा; जरांगेंनी पेटवलं रान
येत्या 17 तारखेपर्यंत राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यात निधी जमा होणार आहे. त्यानंतरही जे अर्ज येताहेत येतील त्यावर कार्यवाही करून त्याही बहिणींच्या बँक खात्यात निधी जमा केला जाणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधकांकडून निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजना बंद होईल असा जो दावा केला जात आहे त्यास फडणवीसांनी दिलेलं हे उत्तर असल्याचं मानलं जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही (Eknath Shinde) शासकीय ध्वजारोहणानंतर लाडकी बहिण योजना सुरुच राहणार असल्याचे सांगितले. लाडकी बहिण योजनेत कालपासून दोन महिन्यांचे दोन हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. निर्णय घेतल्यानंतरच आम्ही सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे. आता 17 तारखेला मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी एक कोटींपेक्षा जास्त बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असे शिंदे म्हणाले.
खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आला, रक्षाबंधनापूर्वीच सरकारचं मोठं गिफ्ट
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. ही योजना 1 जुलैपासून कार्यान्वित झाली असून आतापर्यंत 1 कोटी 35 लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट रोजी या योजनेचे पैसै पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. मात्र, त्याआधीच लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले.