MLA Parinay Phuke : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधक महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. मात्र आता या अधिवेशनात बोलताना भाजप (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांनी खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना केला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आधीच बॅकफूटवर असणाऱ्या महायुती सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यावेळी आमदार परिणय फुके म्हणाले की, विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार होत आहे. विरोधीपक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मी ॲाडीओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. तसेच ऑडिओ क्लिपची फॅारेंसीक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आमदार परिणय फुके म्हणाले की, 2023 मध्ये तत्कालीन मंत्र्याने यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. मी प्रामुख्याने तीन-चार राईस मिलसंदर्भात सांगतोय. या कारखान्यांना घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे. काल विधानसभेमधील प्रश्नोत्तराच्या तासांत यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता मात्र हा प्रश्न मांडण्याच्या दोन दिवस आधीची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे.
… तर गरिबी दूर होणार नाही, मोफत योजनांवरून नारायण मूर्तींचा हल्लाबोल
काही एजंट्स राईस मिलच्या कार्यालयात गेले होते. तिथे यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, अशा धमक्या देण्यात आल्या. त्याची व्हिडीओ क्लिपदेखील माझ्याकडे आहे. असं देखील यावेळी आमदार परिणय फुके म्हणाले.