… तर गरिबी दूर होणार नाही, मोफत योजनांवरून नारायण मूर्तींचा हल्लाबोल

Narayana Murthy : देशात गेल्या काही वर्षांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोफत योजनांची घोषणा करण्यात येत असते. तसेच सध्या देशात केंद्र सरकारसह राज्य सरकार देखील लोकांना फ्री योजना देत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देखील या मोफत योजनांवर ‘फ्रीबीज कल्चर’ म्हणून टीका केली होती.
तर आता टायइकॉन मुंबई-2025 (Tycon Mumbai-2025) कार्यक्रमात बोलताना इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती (N R Narayana Murthy) यांनी देखील या योजनांवर टीका केली आहे. आपल्या देशात फ्री योजनांमुळे गरिबी दूर होणार नाही असं या कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले. देशात रोजगार निर्मितीकरून गरिबी दूर होईल असं त्यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कंपन्यांना देशात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
उद्योजकांच्या एका गटाला संबोधित करताना एन आर नारायण मूर्ती म्हणाले की, तुमच्यापैकी प्रत्येकजण लाखो नोकऱ्या निर्माण करेल आणि आपल्या देशातील गरिबी दूर होईल यात मला काहीच शंका नाही. मोफत वस्तू देऊन तुम्ही गरिबीची समस्या सोडवू शकत नाही, कोणताही देश यात यशस्वी झालेला नाही. असं यावेळी नारायण मुर्ती म्हणाले.
सध्या आपल्या देशात मोफत योजनांवरून वादविवाद सुरू असून यातच इन्फोसिसच्या सह-संस्थापकांचे हे विधान समोर आल्याने पुन्हा एकदा या विषयावर आरोप-प्रत्यारोप सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी स्पष्ट केले की, त्यांना राजकारण किंवा प्रशासनाबद्दल जास्त माहिती नाही. त्यांनी यावेळी दरमहा 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येत आहे मात्र याता फायदा किती होत आहे. याचा देखील अभ्यास झाला पाहिजे. ज्या घरांमध्ये 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येत आहे आपण त्या घरांमध्ये सर्वेक्षण करू शकते जेणेकरून मुले जास्त अभ्यास करत आहेत की नाही याची आपल्याला माहिती मिळेल. असं नारायण मुर्ती या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
‘या’ दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती