एकनाथ शिंदेंची पुण्यात तिरकस चाल; भाजप-सेनेचे नेते अन् कार्यकर्ते हैराण…

विष्णू सानप, लेट्सअप मराठी
Ravindra Dhangekar joined Shiv Sena Discontent among BJP leaders : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दोन दिवसापूर्वी प्रवेश केला. मात्र यावरून भाजप नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र शीर्षस्थ नेत्यांकडून ज्या त्या पक्षांना त्यांचा पक्ष वाढविण्याचा आणि कुणाला घ्यायच अन् काढायच अधिकार असल्यास स्पष्टीकरण देण्यात येत आहे. असं असलं तरी शिंदेंनी पुण्यात धंगेकरांच्या रूपानं खेळलेल्या तिरकस चालीने मात्र भाजप अन् त्यांच्याच शिवसेनेतील काही नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
लाडक्या बहिणींच्या 2100 वरून राडा; रक्कम कधी देणार विचारताच तटकरेंचं फडणवीसांकडे बोट
पुण्यात भाजपची बलाढ्य ताकद असताना आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेही करू पाहत आहेत. मात्र हे करत असताना भाजपशी भिडणारा आणि लढणारा नेता त्यांना हवा होता. लोकसभा आणि विधानसभेत सलग दोन पराभव स्वीकारलेले धंगेकरांची अस्वस्थता शिंदेने हेरून त्यांना गळाला लावलं आहे. मात्र यामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांना हा पक्षप्रवेश चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसत आहे. कार्यकर्ते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत असतांना नेते मात्र अप्रत्यक्षरीत्या आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
काल पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रकांतदादांनी आपलं मत व्यक्त केल. आमच्या महायुतीतील मित्र पक्षांना कोणाला पक्षात घ्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र आमच्या नेत्यांनी धंगेकरांना पक्षात घेतल असत तर मी त्या विरोधात भांडलो असतो, असं स्पष्ट शब्दात आपलं मत त्यांनी व्यक्त केल आहे.
‘आम्ही मैदानात कुठेही नसणार…’ महाराष्ट्र केसरीवर रोहित पवार स्पष्टचं बोलले, सगळंच सांगितलं
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, धंगेकरांसोबत आमचा नुसता पंगा नाही तर आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढलो, एक हरली दोन जिंकल्या मात्र राजकारण आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्टी काळाच्या ओघात बदलत असते याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत. याच कारण तीन पक्षाचं हे सरकार आहे. भाजप नेत्यांनी जर धंगेकरांना पक्षात घेतल असत तर त्या विरोधात मी भांडलो असतो मात्र आमचं तीन पक्षाचं सरकार आहे त्या पक्षातील नेत्यांना कोणाला घ्यायचं याचा अधिकार आहे. आमची काही एकत्रित घटना नाही किंवा आमचे पक्ष मर्ज झालेले नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदेंना वाटलं पुण्यात त्यांना काम वाढवायच त्यामुळे त्यांनी धंगेकरांना शिवसेनेत घेतल आहे, अशी सावध प्रतिक्रिया चंद्रकांतदादांनी दिली आहे. मात्र धंगेकरांबद्दल त्यांच्या मनात काय विचार आहेत हे त्यांनी एकप्रकारे बोलून दाखवले आहे.
कम फॉल इन लव – डीडीएलजे म्यूजिकल। जेना पंड्या आणि अॅशली डे यांचा होळीच्या रंगात नवा अंदाज
दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, धंगेकरांनी शिवसेनेत आल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना नाराज होण्याचे काही कारण नाही. अनेक नेते पक्षात येतात जातात मात्र भाजपचा कार्यकर्ता एका विचाराला बांधील आहे. धंगेकरांनी गेल्या घरी सुखी राहावं असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
माझी गॅरंटी घेवू नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांना नेमकं म्हणायचं काय?
दरम्यान, भाजप नेते धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशाने दुःखी नाहीत असं म्हणत असले तरी आनंदीही ते नक्कीच नाहीत असंच त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येतय. याबरोबरच धंगेकर शिवसेनेत यायच्या आधी एकनाथ शिंदेंची शिवसेना काहीच प्रमुख नेत्यांच्या हाती होती मात्र धंगेकर आल्याने मानपान आणि अधिकारही विभागले जाणार यामुळे आधीचे शिवसेनेतील नेते आणि पदाधिकारी देखील अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.
Video : बलुचिस्तान ट्रेन अपहरणामागे भारताचा हात; शाहबाज सरकारचा मोठा आरोप
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंना शिवसेनेची पुण्यात ताकद वाढवायची आहे यामुळे त्यांनी मिशन टायगर पुण्यात ऍक्टिव्ह केलं होतं या मिशन टायगरला धंगेकर सोडले तर फारसं काही हाती न लागल्याचे सध्यातरी चित्र आहे. मात्र भविष्यात शिंदे आपले पत्ते बाहेर काढू शकतात.
पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे महाराष्ट्रातच; दुचाकीवरून फिरत असतानाचा सीसीटीव्ही समोर
दरम्यान, धंगेकरांसारखा महापालिका आणि विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव असलेला नेता शिंदेंकडे आल्याने भाजपची डोकेदुखी नक्की वाढणार आहे. याचं कारण म्हणजे आरेला कारे करण्याची धमक असलेला नेता सोबतच जनसामान्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणून धंगेकरांची पुण्यात प्रतिमा आहे आणि याचाच फायदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला होऊ शकतो.
… तर सुरेश धस 75 हजारांच्या लीडने निवडून आले असते का? पंकजा मुंडेंचा सवाल
दुसरीकडे ज्या धंगेकरांनी भाजपला पोटनिवडणुकीपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तीन वेळा अंगावर घेतलं अन मोदी शहा आणि फडणवीसांवर टीका केली त्याच धंगेकरांसोबत इच्छा नसताना भाजप नेत्यांना काम करावं लागणार आहे. हे फक्त एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना सोबत घेतल्याने होतंय असा राग देखील भाजप नेत्यांमध्ये अन कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर, ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना भाजपने पक्षप्रवेश दिल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपला डिवचण्याची संधी शोधत होती ती धंगेकरांच्या रूपाने मिळाली आणि शिंदेंनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार , ‘गुलकंद’ मधील ‘चंचल’ प्रेमगीत रिलीज
दरम्यान, आम्ही महायुतीचे मित्रपक्ष आहोत आमचे संबंध चांगले ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे भाजप नेते वरवर सांगत असले तरी ते धंगेकरांसोबत कसं जुळवून घेतात आणि आगामी काळात भाजप नेते आणि धंगेकर यांच्यातील संबंध कसे राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.