Video : बलुचिस्तान ट्रेन अपहरणामागे भारताचा हात; शाहबाज सरकारचा मोठा आरोप

Video : बलुचिस्तान ट्रेन अपहरणामागे भारताचा हात; शाहबाज सरकारचा मोठा आरोप

Balochistan Train Hijack : बलुचिस्तानमध्ये ५०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे बलुच बंडखोरांनी अपहरण केल. या दहशतवादी हल्ल्याबाबत, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे (Train ) सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी थेट भारतावर रेल्वे अपहरणाचा गंभीर आरोप केला आहे.

यापूर्वी बलुच बंडखोरांनी नागरिक, महिला आणि मुलांना सोडलं होतं, तर पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी, गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवलं होतं. एका वृत्तसंस्थेनुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि ट्रेन रुळावरून घसरली आहे. बलुच बंडखोरांनी २१४ प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावाही केला आहे. त्यातील १०४ ओलीसांची सुटका करण्यात पाकिस्तनाच्या लष्कराला यास मिळाले आहे.

पाकिस्तानातच नाही.. भारतातही अनेक वेळा रेल्वे अपहरणाच्या घटना, कधी घडल्या जाणून घ्या

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी बलुचिस्तान ट्रेन अपहरण घटनेबाबत भारतावर निराधार आरोप केले आहेत. हा तोच पाकिस्तान आहे, ज्याने दशकांपासून दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले, दहशतवादी संघटनांना आश्रय दिला आणि जिहादचे विष पसरवले, पण आता कोणत्याही पुराव्याशिवाय भारतावर आरोप करत आहे.

राणा सनाउल्लाह एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, ‘या हल्ल्यामागे भारताचा हात आहे. भारत हे हल्ले अफगाणिस्तानच्या आतून करत आहे असंही ते म्हणाले आहेत. जेव्हा त्यांना विचारले की तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि बलुच बंडखोरांमध्ये काही संबंध आहे का? टीटीपी बलुचांना पाठिंबा देते का? तर याला उत्तर देताना राणा सनाउल्ला म्हणाले, भारत हे सर्व करत आहे, यात काही शंका नाही. यानंतर, बलुच बंडखोरांना अफगाणिस्तानात सुरक्षित आश्रय मिळतो. असंही त्यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानात नियोजन

राणा सनाउल्लाह पुढे म्हणाले, अफगाणिस्तानात बसून ते सर्व प्रकारचे कट रचतात. पाकिस्तानचे शत्रू सक्रिय आहेत आणि आता त्याबद्दल दुसरे मत नाही. हा राजकीय मुद्दा नाही किंवा कोणत्याही अजेंड्याचा भाग नाही, तर एक कट आहे. भारतावर गंभीर आरोप करत ते म्हणाले, हो, भारत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) दोघांनाही पाठिंबा देत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube