Download App

खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील (Maharashtra)सत्तांतरानंतर शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)आणि ठाकरे (Shivsena thackeray Group)गटातील वातावरण कमालीचं तापलं आहे. दररोज कोणत्या न् कोणत्या कारणानं एकमेकांवर जहरी टीका केली जात आहे. एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. अशाच एका प्रकरणातून दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High court)शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) समन्स बजावला आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंसह संजय राऊतांनाही दिल्ली न्यायालयाने समन्स बजावले आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये न्यायालयाने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावलं आहे.

Taapsee Pannu विरोधात तक्रार दाखल; सनातन धर्माची प्रतिमा दुखावल्याचा आरोप

या मानहाणी प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयाने आज दाखल करुन घेतली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंना समन्स बजावलं आहे. त्याचबरोबर समन्स बजावत त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याचबरोबर या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने विविध प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या मानहाणी प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयाने आज दाखल करुन घेतली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंना समन्स बजावलं आहे. त्याचबरोबर समन्स बजावत त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याचबरोबर या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने विविध प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदार, खासदारांबद्दल केलेली आक्षेपार्ह वक्तव्य आद्यापही आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयानं विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधातही नोटीस काढली आहे. त्यांना विचारणा केली आहे की, तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्यापही या तिघांनी आमदार, खासदारांबाबत केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पोस्ट आहेत. त्या हटवण्यात का आलेल्या नाहीत, याबाबत खुलासा करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 एप्रिलला पार पडणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे नेते या सुनावणीला उपस्थित राहणार का? हे पाहावं लागणार आहे.

Tags

follow us