Download App

धक्कादायक! ‘मी जीवनाचा आनंद घेतला आहे’; पोलीस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाने जीवन संपवलं

साहिल बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. 12 ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी दसरा साजरा केला. साहिलही उत्साहाने त्यात सहभागी झाला होता.

  • Written By: Last Updated:

Sahil Nandedkar Suicide : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे. मी जीवनाचा आनंद घेतला आहे, लव्ह यू बोथ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

झारखंडमध्ये तीन तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका? या  दिवशी होणार घोषणा

साहिल शीलवंत नांदेडकर (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याने एवढे टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र स्पष्ट झालं नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिल बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. 12 ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी दसरा साजरा केला. साहिलही उत्साहाने त्यात सहभागी झाला होता. रात्री उशिरापर्यंत आई-वडिलांसोबत त्याने गप्पा मारल्या. त्यानंतर सर्वजन झोपी गेल्यावर त्याने गळफास घेतल्याचं बोललं जातय.

Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात मोठा ट्वीस्ट ! आरोपीच्या वयाची चाचणी होणार

नेहमीप्रमाणे उपायुक्त नांदेडकर हे सकाळी 6 वाजता वॉकिंगला जाण्यासाठी उठले. तेव्हा मुलगा साहिल झोपेतून उठला नसल्याचं त्यांनी पाहिले. त्यामुळे नांदेडकर यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवून आवाज दिला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी चार ते पाच वेळा आवाज दिल्यावरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे जोरात दरवाजा वाजवला. शेवटी त्यांनी बाजूला जाऊन खिडकीतून डोकावून पाहिल्यावर साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ कुटुंबातील इतरांना हा प्रकार कळवला.

follow us