Download App

Devendra Fadanvis लाज वाटू द्या, शरम करा, पुण्यातील ‘त्या’ मुलीला न्याय नाहीच; खडसे संतापले

Devendra Fadanvis : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर पुण्यात एका मुलीवर अत्याचार झाला. या प्रकरणावरून खडसून टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस लाज वाटू द्या काही शरम करा. पुण्यात एका मुलीवर अत्याचार झाला. तुम्हाला तक्रार करुनही चार महिने झाले कारवाई झाली नाही. ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिरामध्ये बोलत होते.

मेव्हण्याचे लाड पुरवण्यासाठीच….; ‘महानंद’ चा लेखाजोगा काढत राऊतांनी खुलं केलं विखेंचं गुपित

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये काल (3 जानेवारीपासून) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा दोन दिवसीय मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्याचा आज दुसरा दिवस होता. त्यामध्ये एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यात एका मुलीवर अत्याचार झाला. त्या प्रकरणी तक्रार करुनही चार महिने झाले कारवाई झाली नाही. म्हणून खडसे यांनी राज्याचे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.

100 कोटींपेक्षा अधिक हिट सिनेमा दिलेले टॉप अभिनेते कोण? जाणून घ्या रणबीरचं स्थान

ते म्हणाले की, महाराष्ट्र अशांत आहे. गृहखात फेल झाला आहे. मी विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं होतं. तुमच्यासारखा अपयशी गृहमंत्री मी पाहिला नाही. त्यावेळी ते चांगले संतापले होते. तसंही त्यांचा आणि माझं प्रेम जास्त आहे. मग त्यांनी गुन्हे कमी झाल्याचे पुरावे दाखवले. पण जर गुन्ह्यांची नोंदच होत नसेल तर कुणीत कमी झाले हे कसं म्हणता येईल.

फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही ‘त्या’ दिवसाची…”

सध्या राज्यात पोलीस यंत्रणा लाचार झाली आहे. पोलीस सध्या फक्त विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे त्यांना अटक करणे एवढे एकच काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे गुंड जरी असतील तर त्यांना संरक्षण देण्याचे काम केले जाते. यावेळी खडसेंनी पुण्यातील एका मुलीवर अत्याचार झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ही मुलगी डेंटिस्ट कॉलेजला शिकायला आहे. तीन महिन्यापूर्वी तिच्यावरती एका गुंडाने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

प्रिन्सिपलकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांना सांगण्यात आलं. तर पोलिसांनी संबंधित गुंडाचा इतिहास पाहिला असता. पोलिसांनी त्याला पकडलं नाही. त्यानंतर त्या मुलीवर जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओ देखील असल्याचा यावेळी खडसेंनी सांगितलं. त्यावर हा प्रश्न मी विधान परिषदेमध्ये फडणवीस यांना विचारला होता. त्यांनी कारवाई करण्याचा आश्वासन दिले होते मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात काहीतरी करा. शरम करा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रिया या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी दिली.

follow us

वेब स्टोरीज