पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये शिवसेना (Shivsena) जेव्हा होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत (BJP) येण्याचे संकेत दिले होते. एवढेच कशाला जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले तेव्हाही उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, असा पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गौप्यस्फोट केला आहे. कसबा पेठ आणि चिंचवड निवडणुकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात येणाऱ्या काळात बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोदी पॅटर्न, कसबा-चिंचवडचा प्रचार संपताना टीव्हीवर मुलाखत
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षे महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे इतर अनेक नेते प्रचंड अस्वस्थ होते. त्यामुळे तेव्हाही वारंवार उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडण्याचे आम्हाला संकेत देत होते. मात्र, त्यात फारसं काही झाले नाही. त्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले. तेव्हाही उद्धव ठाकरे हे सतत फोन करत होते. मात्र, परिस्थिती खूपच बिघडली होती. त्यामुळे पुढे जे काही झाले ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे.
‘ते’ दिव्यांग दाम्पत्य एकदाच Devendra Fadanvis यांना भेटले आणि लगेच काम झाले!
महाविकास आघाडीबरोबर उद्धव ठाकरे यांनी जेव्हा निर्णय घेतला. तेव्हा एकनाथ शिंदे हेच सुरुवातीपासून प्रचंड अस्वस्थ होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना समजावण्याचा देखील प्रयत्न केल्याची आम्हाला माहिती होती. परंतु, तरीही महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. मात्र, जसे महाविकास आघाडी अस्तित्वात आली तशी शिवसेनेतील इतर नेते अस्वस्थ होऊ लागले. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. त्यामुळे या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा येण्याचे संकेत दिले होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=vDNWG_oKKYw
तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून जेव्हा सुरतला गेले. हळूहळू त्यांच्यामागे एक-एक आमदार सोडून गेला तेव्हाही उद्धव ठाकरे हे सतत आम्हाला फोन करत होते. पण त्याला नाराज गटाने फारस महत्व दिले नाही. त्यामुळे शिवसेना फुटली असे देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे.