‘ते’ दिव्यांग दाम्पत्य एकदाच Devendra Fadanvis यांना भेटले आणि लगेच काम झाले!
पुणे : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील एक ज्येष्ठ वृद्ध दिव्यांग दाम्पत्य आहे. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर करण्यासाठी आजवर अनेक मुख्यमंत्र्यांना भेटले पण त्यांचं काम काय झाले नाही. मात्र, त्या एकदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना भेटल्या आणि अवघ्या २५ दिवसांत त्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र आज देण्यात आले. त्यामुळे त्या वृद्ध दिव्यांग दाम्पत्याच्या सुनीता आष्टुक (Sunita Astuk) यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आले. त्या म्हणाल्या की, आजवर अनेक मुख्यमंत्र्यांना भेटले पण काम काही होत नव्हते.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ३१ जानेवारी २०२३ ची मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यानंतर एक दिव्यांग आजी मला भेटल्या. पेन्शन मिळत नाही, एवढेच त्यांनी सांगितले. पेन्शन कशाची हेही ठावूक नव्हते. सोबत दृष्टीबाधित आजोबाही होते. त्यांच्या खिशात फोन होता. पण, नंबरही सांगता येत नव्हता. मात्र, आजच्या आज मला पेन्शन मिळालीच पाहिजे, असा आजींचा आग्रह होता. आजोबा मोठ्या अभिमानाने सांगत होते, आजी आजवर अनेक मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना भेटल्या. पण, काम कुणी करीत नाही.
https://www.youtube.com/watch?v=vDNWG_oKKYw
१० मिनिटांच्या संवादानंतर सुदैवाने त्यांचा अर्ज मिळाला. तर त्यांचे श्रीमती सुनीता आष्टुक असे त्यांचे नाव आहे. त्या हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे वास्तव्यास आहेत. मी, तो अर्ज पुण्याच्या जिल्हाधिकार्यांना पाठविला आणि त्यांनी तत्काळ उपविभागीय अधिकार्यांमार्फत कार्यवाही केली. त्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र आज देण्यात आले. मला आनंद आहे की, या वृद्ध दिव्यांग दाम्पत्याची सेवा मला करता आली. शेवटच्या माणसाचा विकास हेच ध्येय ठेऊन राजकारणात काम करायचे असते. याबद्दल सर्व अधिकार्यांचेही अभिनंदन मी करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.