Download App

Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप

Devendra Fadanvis : आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला ही वस्तुस्थिती नाही. मात्र या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर एडीट करून टाकण्यात आले. कारण त्यानंतर पोलिसांनी तेथील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं. त्यात कोणावरही लाठीचार्ज झालेला नाही. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadanvis on Aalandi baton charge on varkari Aashadi Wari by Police )

Amit Shah in Pune: मोदींनंतर अमित शाह यांचाही पुणे दौरा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही असणार उपस्थित

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवाशन सुरू आहे. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवर फैलैवर घेतल्याचे पाहायाला मिळाले आहे. त्यावर आज विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना आषाढी वारीला जाण्याऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये झालेल्या वारकऱ्यांवरील पलिसांच्या लाठीचार्जवर उत्तर दिले त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला ही वस्तुस्थिती नाही. कोणतही सरकार वारकऱ्यावर लाठीचार्ज करत नाही. ती वेळही येऊ नये. तर गेल्या वर्षी पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी मंदीरामध्ये सर्वांना प्रवेश दिला. त्यावेळी तेथे महिलां महिलांमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली होती. त्यावर व्यवस्थित नियोजन करण्यासाठी आळंदीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, मंदीर विश्वस्त आणि दिंड्यांचे प्रमुख यांच्यात झालेल्या बैठकीत पास असणाऱ्यांनाच मंदीर प्रवेश द्यायचा असं ठरलं. त्यानुसार तेथे बॅरिकेट्स लावण्यात आले.

Ahmednagar BJP : बाहेरून आलेल्यांच्या पालख्या उचलणार नाही… शहराचा आमदार भाजपाचाच व्हावा

पुढे फडणवास म्हणाले, मात्र तेथे काही वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आले त्यांनी मंदीर प्रवेशाचा आग्रह धरला. त्यांना पास धारकांचं दर्शन झाल्यानंतर प्रवेश दिला जाईल असं सागण्यात आलं. त्यांनी पोलीस, ग्रामस्थ, मंदीर विश्वस्त कुणाचंही न ऐकता बॅरिकेट्स तोडले. पोलिसांच्या अंगावर गेले. पोलीस जखमी झाले. यात पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर एडीट करून टाकण्यात आले.

कारण त्यानंतर पोलिसांनी तेथील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं. त्यात कोणावरही लाठीचार्ज झालेला नाही. तर त्यातील एका प्रमुख वारकरी विद्यार्थ्याने स्वतः पोलिसांत येत माहिती दिली की, त्यांना कोणतीही मारहान झाली नाही. त्यांनी मीडियावरही हे सांगितलं. एका तरूणाला लागलं मात्र ते लाठीचार्जमुळे नाही तर बॅरिकेट्समुळे खरचटले. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Tags

follow us