सुपारी बाज लोकांच्या सांगण्यावरून श्याम मानवांचे माझ्यावर आरोप; फडणवीसांचं बोट कुणाकडे?

Devendra Fadanvis यांनी माध्यमांशी बोलताना श्याम मानव यांनी केलेल्या अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याच्या आरोपांना उत्तर दिले

Devendra Fadnavis

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis on Sham Manav for his Allegations : श्याम मानव (Sham Manav) मला चांगलं ओळखतात. मात्र त्यांनी सुपारी बाज लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप (Allegations) केले आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याचे आरोप केले. त्याला फडणवीसांनी (Devendra Fadanvis) माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.

Video : …तर सर्व गोष्टी पब्लिक करेल, देशमुखांना गर्भित इशारा देत फडणवीसांनी दंड थोपटले

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, श्याम मानव मला चांगलं ओळखतात त्यांनी आरोप करण्यापूर्वी माझ्याशी बोलायला हवं होतं. मात्र त्यांनी माझ्यावर केलेले हे आरोप सुपारी बाज लोकांच्या सांगण्यावरून केले आहेत. जे माझ्या विरोधात एक इकोसिस्टीम चालवत आहेत. असं म्हणत फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव टाकल्याच्या आरोपांवर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.

देशमुखांना गर्भित इशारा देत फडणवीसांनी दंड थोपटले…

माझा एक सिद्धांत आहे. मी कुणाच्याही नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागलं तर मी त्याला सोडत नाही. तर अनिल देशमुख यांच्या विरोधात काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला आणून दिले होते. ज्यामध्ये ते उद्धव ठाकरे, शरद पवार, आज माझ्यावर जे आरोप केले त्याबाबत तसेच वाझेंवर यांच्याबाबत काय बोलत आहेत? हे सर्व रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे जर कोणी रोज खोटं बोलून नॅरेटिव्ह सेट करत असतील. तर या सर्व गोष्टी मी पब्लिक करे कारण देवेंद्र फडणवीस कधीच पुरावे शिवाय बोलत नाही.

राजू शेट्टींना धक्का, रविकांत तुपकर यांची मोठी घोषणा, राजकारणात नवीन ट्विस्ट?

नेमकं प्रकरण काय आहे?

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठीही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दबाव टाकण्यात आला होता. असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यांच्या या आरोपांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे.

Exit mobile version