Download App

भाऊबीज परत घेतली जात नाही; सावत्र भावाची उपमा देत फडणवीसांचं विरोधकांना उत्तर

Devendra Fadnavis :  विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojana) योजनेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis :  विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladaki Bahin Yojana) योजनेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहे. यातच आज जळगावमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेत आहे का? तुम्ही महिलांना लाच देत आहे का? अरे  नालायकांनो, कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. तर कुणी म्हणत आहे की, 1500 रुपये माघारी घेऊ,  अरे वेड्यांनो, दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत. कुणाचा बापही ही योजना बंद करू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले की, परवा एक नेते म्हणाले की, 1500 रुपयांमध्ये काय होणार? मला त्यांना प्रश्न आहे तुम्हाला जेव्हा संधी मिळाली होती तेव्हा तुम्ही काय केलं? आम्ही आता 1500 रुपये देत आहोत तर तुमच्या पोटात का? दुखत असं म्हणत फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

तर महायुतीमधील आमदार रवी राणा यांनी गंमतीमध्ये मतं जर दिली नाही तर पैसे परत घेतले जातील असं म्हटले होते यावर देखील फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं सांगितलं. तसेच ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी आहे असं देखील ते म्हणाले.

31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट महिन्यांचे पैसे आम्ही देणार आहोत अशी देखील माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली तसेच महिलांच्या हातात पैसे पडले की ते योग्य ठिकाणी कारणी लागतात मात्र पुरुषांच्या हातात पैसे पडले तर ते कुठे जातील हे सांगता येतं नाही. असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये कृष्णा श्रॉफ पुन्हा करणार धमाकेदार एन्ट्री? अनेक चर्चांना उधाण

महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.

follow us