Download App

तीन महिन्यात उचलबांगडी! फडणवीसांच्या मर्जीतले श्रावण हार्डीकर पुन्हा नागपुरात

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मर्जीतले मानले जाणारे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हार्डीकर(Shrawan Hardikar) यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतून त्यांची थेट आता नागपुरात बदली झालीयं. हार्डीकर यांची नागपुरात महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे.

राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील; ‘त्या’ अहवालावरून शेलारांचा निशाणा

मागील वर्षी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र केलं होतं. अद्यापही बदल्याचं सत्रच सुरुच असल्याचं दिसून येत आहे. या बदल्यांच्या सत्रामध्ये सत्ताधाऱ्यांकडून मर्जीतल्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची मुदतीच्या आधीच बदली करण्यात आल्याने या बदल्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यामध्ये पिंपरी महापालिकेचे काही अधिकारी आहेत. हार्डीकरही त्यांच्याच यादीत गणले जात असून मुदत पूर्ण होण्याआधीच त्यांचीही बदली झालीयं.

पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…

हार्डीकर आधी नागपुरात होते. राज्यात फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची बदली पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यांची पुण्यातच मुद्रांक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. कोरोना काळातही त्यांनी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम पाहिलं असून आपल्या कोरोनाबरोबरच रहायचं आणि जगायचंय असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांचे शब्द खरे ठरले होते.

दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार झाले आणि हार्डीकर यांची मुंबईत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली. मुंबईतील कार्यभार सांभाळताच दुसऱ्याचं दिवशी ते प्रशिक्षणासाठी गेले होते. आता मुंबईतून पुन्हा त्यांची नागपूरला बदली झाली आहे.

Tags

follow us