Download App

Devendra Fadnvis : शेतकऱ्यांना रुपयांत पीकविमा दिला तर पोटात का दुखतंय?

मुंबई : आम्ही शेतकऱ्याना 1 रुपयांत पीकविमा दिला तर तुमच्या पोटात का दुखतंय? असा सवाल अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केला आहे. आज अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलंच धुतलंय.

दोघांत तिसरा आला, कोण-कुणाचा लव्हर? देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच सरकारच्या काळात शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसेच मिळाले नाहीत. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांच्या पीकविम्याची काय स्थिती होती? ही स्थितीच देवेंद्र फडणवीसांनी वाचून दाखवलीय.

1999 ते 2014 साली 25 लाख शेतकऱ्यांना 578 कोटी रुपये देण्यात आले तर 2015 ते 2020 साली 1. 25 कोटी शेतकऱ्यांना 2880 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच 2021-22 साली महाविकास आघाडी सरकारने 60 लाख शेतकऱ्यांना 1990 कोटी रुपये दिल्याचं फडणवीसांना सांगितलं आहे.

‘ऊन, वारा, पाऊस असला तरी सभा होणारच, अजित पवारांचा इशारा

तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या पीकविमा कंपन्यांच्या घशात पैसा गेल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे. आम्ही शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार मिळून विविध योजनांचा लाभ देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी जेव्हा अर्थिक संकटात सापडतो तेव्हा त्याच्याकडे पेरणी करण्यासाठीही पुरेसे पैसे नसतात. अशावेळी आम्ही देत असलेले सहा हजार रुपये त्यांच्या कामी येत असल्याचंही त्यांनी प्रत्युत्तरात म्हंटलयं.

पुद्दुचेरीची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

शेतकऱ्यांनी आम्ही सहा हजार रुपये देण्याची सुरुवात केलीय. त्यांना सहा हजारांवर सहा हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार मिळणार असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. उद्या या 12 हजारांमध्ये आणखीन वाढ होणार असल्याचीही अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केलीय.

दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून विविध योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्थिक संकटात मोठी मदत मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Tags

follow us