दोघांत तिसरा आला, कोण-कुणाचा लव्हर? देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

दोघांत तिसरा आला, कोण-कुणाचा लव्हर? देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

मुंबई : दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लव्हर आहे? नेमकेचि बोलायचे तर, प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे, अशी सुर्यकांत डोळस यांनी लिहिलेली वात्रटिकाच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात वाचून दाखविली आहे.


राहुल गांधींनी संसदेत माफी मागावी, स्मृती इराणींचा हल्लाबोल

तसेच जयंतराव तुम्ही सुर्यकांत डोळस यांच्या मोजक्याचं दोन वात्रटिका वाचलेल्या दिसताहेत, असं प्रत्युत्तर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरील झालेल्या चर्चेला दिलंय.

फडणवीसांनीही केली आठवलेंच्या स्टाईलची कॉपी; तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही..

राज्याचा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून आपल्या अभिभाषणात सडेतोड टीका करण्यात आली.

या टीकेनंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधी मंडळाच्या अधिवेशात जयंत पाटलांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटील सत्तेत असतानाच्या सुर्यकांत डोळस यांच्या वात्रटिकेपैकी एक वात्रटिका वाचूनच दाखविली आहे.

अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; अरुणाचल प्रदेश भारताचाच…

वात्रटिकेत लिहिलं की, “दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लव्हर आहे? नेमकेचि बोलायचे तर, प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे. तिघाडीची झाली आघाडी, तीन-तीन हायकमांड आहेत.देशी-विदेशी झाले कालबाह्य, बदलत्या काळाच्या,बदलत्या डिमांड आहेत” असं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात डोळस यांनी लिहिलेल्या वात्रटिका फडणवीसांनी वाचून दाखविल्या आहेत.

दरम्यान, काल जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हेत त्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी टीका केली होती. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना वात्रटिका वाचूनच थेट उत्तर दिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube