मुंबई : विरोधकांनी लिहुन आणलेल्या प्रतिक्रियांना आम्ही प्रत्युत्तर दिल्याने ते आता चुनावी म्हणत असल्याचं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी दिलं आहे. आज अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे.
'आम्ही पंचसुत्री मांडली यांनी तर पंचामृत मांडली'#Budget20232 #MaharashtraBudget2023https://t.co/VSy2OuUcej
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 9, 2023
फडणवीस म्हणाले, विरोधकांचं टीका करण्याचं काम, आमचं अर्थसंकल्प मांडण्याच काम आहे. विरोधकांकडून सकाळी तीन चार प्रतिक्रिया लिहुन आणल्या होत्या त्या प्रतिक्रिया आम्ही बोल्ड केल्या म्हणूनच ते आता चुनावी म्हणत असल्याचं ते म्हणालेत. हा अर्थसंकल्प आम्ही ग्राऊंडवर आणून दाखवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
तसेच फडणवीस यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही भाष्य केलं आहे. स्मारकाबाबत सर्वोच्च न्यायालयात आम्ही केस लढवत असून आम्ही केस जिंकणार आहोत. न्यायालयाचा अवमान होईल म्हणूनच स्मारकाबाबत आम्ही तरतूद केली नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शिवरायांच्या नावाने फक्त घोषणाच अर्थसंकल्पात उल्लेख नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्याला सडेतोड प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं आहे.
Maharashtra Budget 2023 : फडणवीसांचे असेही ‘मोदी प्रेम’, थेट त्यांच्याच नावानी केली नवी योजना
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकांबाबतही भाष्य केलं आहे. निवडणूक आणि बजेटचा काहीही संबंध नसून निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आम्ही विधानसभेच्या निवडणुका वेळेवर घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणा आहे. तसेच शिंदे निवडणुकीला सामोरे जात पुन्हा निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर राज्यावर साडेसहा हजार कोटीचं कर्ज असल्याचं अजित पवारांनी म्हंटलंय. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय. फडणवीस म्हणाले, जोपर्यंत भारत विकसनशील राष्ट्र आहे तोपर्यंत कर्जाचा डोंगर कमी करण्याच विचार करता येत नाही. शासनाने कर्ज घेतलेली रक्कम योग्य ठिकाणी लावली पाहिजे, असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.
मी अमृताकडे वळतो, अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले सभागृहात हशा पिकला, काय होता किस्सा?
दरम्यान, राज्याचा जेवढा खर्ज आहे तेवढाच आम्ही करत आहे. जेवढी तरतूद त्यापेक्षाही अधिक खर्चही येत असतो. त्यासाठी पुरवणी असते. दरवर्षी आपण जेवढं कर्ज दाखवतो तेवढा पैसा आपल्याला लागत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आहे.
त्याचप्रमाणे कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली, आत्ता पुन्हा देश उभारत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा आत्तापर्यंतचा सर्वोकृष्ट अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच मराठवाड्यासाठी आम्ही मोठी तरतूद केल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.