Download App

‘महिला सुरक्षा अन् सायबर क्राईम प्रतिबंधाला प्राधान्य’; पदभार स्वीकारताच DGP रश्मी शुक्लांनी सांगितलं

Image Credit: Letsupp

Rashmi Shukla : बेधडक आयपीएस अधिकारी अशी ओळख असलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच राज्यात महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम प्रतिबंधाला प्राधान्य देणार असल्याचं शुक्ला यांनी सांगितलं आहे. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शुक्ला बोलत होत्या.

Aarya 3: ‘लौट आई है शेरनी…’ सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’चा दमदार टीझर प्रदर्शित

पुढे बोलताना शुक्ला म्हणाल्या, राज्यातील महिलांची सुरक्षा बळकट करण्याचा प्राधान्य देणार असून यासोबतच अलीकडच्या काळात सायबर क्राईम वाढत असल्याचं दिसतंय. राज्यात सायबर क्राईला प्रतिबंध घालण्यासाठीही प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातील महामार्गावर अपघात घडत आहेत, त्यावरही उपाययोजना करुन अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचं रश्मी शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक बनल्या आहेत.

Disqualification MLA : लवाद अन् आरोपींची दोनवेळा भेट; उद्धव ठाकरेंनी भेटीचा पुरावाच दाखवला

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1965 ला मुंबईत झाला. सुरुवातीच्या शिक्षण त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स स्कूलमधून घेतलं. त्यानंतर एलफिस्टन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन आणि मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यांनी मास्टर्स कम्प्लीट केलं. आणि याचवेळी त्यांनी यूपीएससीची तयारी केली. 1988 मध्ये सिविल सर्विस परीक्षा क्रॅक करत त्यांची निवड आयपीएस म्हणून झाली. यामध्ये त्यांना महाराष्ट्र हेच कॅडर मिळालं.

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीसमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलं. त्यामध्ये औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण, सातारा, पुणे ग्रामीण या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं. त्याच बरोबर त्या मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर आणि पुणे शहरांमध्ये गुन्हे शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार त्यांना दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी सीबीआयच्या उप महानिरीक्षक तर हैदराबाद मध्येच त्यांनी सीआरपीएफचे अतिरिक्त महानिर्देशक म्हणूनही काम पाहिलं.

दरम्यान, शुक्ला यांच्यावर मागील काळात विरोधकांकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी शुक्ला चांगल्याच प्रकाझोतात आल्या होत्या. शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जात असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्लांना चांगलचं धारेवर धरलं. पण उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2023 मध्ये शुक्लांवरील सगळे एफआयआर रद्द करत त्यांना निर्दोष ठरवलं. अखेर आता शुक्ला यांनी पोलिस महासंचालकपदाचा पदभार स्विकारला आहे.

follow us

वेब स्टोरीज