बीड : जिल्ह्यातील 12 हजार शेतकऱ्यांचे बॅंकखाते गोठवणाऱ्या बजाज अलियांस विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. चुकीचा पीकविमा जमा झाल्याचं कारण देत बीडमधल्या शेतकऱ्यांचं बॅंकखातं गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच आजचा चौथा दिवस आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आपल्या भाषणात मुंडे यांनी ही मागणी केलीय. मुंडे यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलंय.
'कसब्यात झालेल्या नव्या बदलाचं स्वागत'#UdhavThackeray #Devendrafadnvis #kasbabypollresultshttps://t.co/feGIIUGBif
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 2, 2023
मुंडे म्हणाले, सर्व शेतकऱ्यांचे सीबील बिघडणार नाही याची काळजी घेऊन बँकखाते पूर्ववत करून द्या. शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी मुंडे यांनी विधानसभेत केलीय.
खरीप हंगामात विमा कंपनीने काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 कोटी रुपये रक्कम जमा केले. मुळात शेतकरी पात्र असूनही विमा मिळत नाही आणि त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले होते.
`Pune BJP म्हणजे मोहोळ, मुळीक, बीडकर आणि रासने हे काही योग्य नाही`
एवढा मोठा व्यवहार करणारी विमा कंपनी जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकून पैसे आल्याचे सांगते हे अत्यंत अव्यवहारी असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी नमूद केले. ऐन अडचणीच्या
काळात शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खात्यावरील जमा पैसे उचलता येत नव्हते.
त्या काळात विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता ते १२ हजार शेतकरी नेमके कोणते, याबाबतही संभ्रम असल्याने अनेक शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. तसेच विमा कंपनीच्या चुकीच्या वसुली धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिबिलवरही परिणाम झाल्याचं मुंडे यांनी म्हटंलय.
17 गोण्या कांदा विकून हातात आला 1 रुपया!, ‘सरकार, सांगा आम्ही जगायचं कसं ?’
दरम्यान, यासंदर्भात शासनाने कारवाई करण्याचे निर्देश विमा कंपनीला द्यावेत व विमा कंपनीने केलेल्या चुकीमुळे शेतकऱ्यांना जो त्रास झाला, त्याबाबत विमा कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी मुंडे यांनी केलीय.
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची नोंद घेतली असून योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.