‘जनता दरबार’ सुरु असताना अचानक बिघडली धनंजय मुंडेंची प्रकृती; रुग्णालयात दाखल

Dhananjay Munde : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती

Dhananjay Munde

Dhananjay Munde

Dhananjay Munde : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार धनंजय मुंडे यांचे नेहमीप्रमाणे परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात जनता दरबार सुरु होते मात्र जनता दरबार सुरु झाल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने अतिथीगृहाशेजारील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टर सध्या त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

पक्षप्रमुख पद अन् सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचा मोठा दावा; ठाकरेंना धक्का?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येताच समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

iPhone 17 खरेदी करता येणार फक्त 34,355 रुपयांत! जाणून घ्या सर्वात भारी ऑफर

Exit mobile version