पक्षप्रमुख पद अन् सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचा मोठा दावा; ठाकरेंना धक्का?
Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
Shivsena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. तर आता शिंदे गटाकडून न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. शिंदे गटाकडू ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहे. आज झालेल्या युक्तिवादात त्यांनी पक्षप्रमुख पदावर मोठा दावा केल्याने ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज झालेल्या युक्तिवादादरम्यान नीरज कौल (Neeraj Kaul) यांनी शिवसेनेच्या पक्षघटनेतील तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी मागील सुनावणीवेळी 1999 सालच्या शिवसेना घटनेबाबत माहिती दिली होती. तर या या सुनावणीदरम्यान त्यांनी सांगितलं की, शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेमध्ये प्रतिनिधी सभा ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. शिवसेना (Shivsena) प्रमुखाची नियुक्ती ही प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर केली जाते. तसेच युक्तिवादादरम्यान कौल यांनी सर्वोच्च पदाची रचना, त्यातील बदल आणि संबंधित घटनात्मक तरतुदी यांचा तपशील न्यायालयासमोर मांडला.
ठाकरे गटाचा पक्षप्रमुख पदावार दावा चुकीचा
आज झालेल्या युक्तिवादादरम्यान पक्षप्रमुख हे पद 2018 सालच्या पक्षघटनेत प्रथमच निर्माण झाला असल्याचा दावा चुकीचा आहे असं कौल यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानानंतर त्यांच्या सन्मानार्थ शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं आणि ही प्रक्रिया 2013 मध्येच झाली होती असा दावा कौल यांनी यावेळी केला.
काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल; 130 नेत्यांची यादी तयार, राहुल गांधी कुणाला देणार संधी?-
त्याच काळात पक्षातील नेतृत्वाच्या रचनेमध्ये पक्षप्रमुख पद अस्तित्वात आला होता असा दावा देखील सर्वोच्च न्यायालयात कौल यांनी केला आहे.कौल यांनी केलेल्या आजच्या युक्तिवादामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.