Anjali Damania Allegations On Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कृषीमंत्रीपदावरून राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर राजकारण सुरू झालंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. परवा संध्याकाळी उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. या आदेशात अनेक त्रुटी आहेत. सरकारच्या बाजूचे वकील अतिशय शातीरपणे मांडणी करत होते. त्यांनी दोन वेगवेगळ्या विभागांचे जीआर असल्याचं सांगून भ्रम निर्माण केला. हे सगळं चुकीचं होतं. सर्वोच्च न्यायालयात ही लढाई घेऊन जाणार आहोत, असं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलंय.
ब्रेकिंग! अश्लील कंटेंटवर केंद्र सरकारचा चाबूक, ‘या’ मोबाइल ॲप्सवर घातली बंदी
भ्रष्टाचाराचा अँगल
दमानिया यांचं म्हणणं आहे की, संपूर्ण प्रकरणात भ्रष्टाचाराचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. विशेष म्हणजे, लोकांचे पैसे वापरून कार्यक्रमांचे आयोजन, खाजगी कंपन्यांना दिलेले आदेश, आणि कृषी खात्याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनियमितता या कोणत्याच मुद्द्यांचा विचार न्यायालयीन युक्तिवादात झाला नाही. धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळालेली नाही, कारण भ्रष्टाचाराचा अँगल अजूनही विचारात घेतलेला नाही. या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. माझा लढा लोकायुक्त कार्यालयात अजूनही सुरू आहे.
अहिल्यानगरमध्ये जमावाकडून घरावर हल्ला; तूफान राड्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर
आंदोलन छेडेल
दमानिया यांनी एक मोठा खुलासा करत सांगितलं की, जेव्हा कृषी खात्याच्या सचिव वी. राधा यांनी सातत्याने प्रकरणात अनियमितता असल्याचं नमूद केलं, तेव्हा त्यांची तडका-फडकी बदली करण्यात आली. वी. राधा यांचा अहवाल कधीही समोर मांडण्यात आला नाही, असा दावा त्यांनी केला. दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत सांगितलं की, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नये. त्यांनी मंत्री म्हणून पुन्हा वापसी केल्यास आंदोलन छेडेल.
पुन्हा सत्तेत आणण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की, आधी धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे यांच्यासारखे लोक कृषीमंत्री बनतात, अशी संतप्त प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे. त्यांचा दावा असा आहे की, हे प्रकरण जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं. याचिकाकर्त्यांची बाजू नीट मांडली गेली नाही. सरकारी वकिलांनी मुद्दाम गैरसमज निर्माण करणारी बाजू ठेवली. हे सगळं पाहता मुख्यमंत्र्यांचा हेतू धनंजय मुंडेंना पुन्हा सत्तेत आणण्याचा असावा, अशी स्पष्ट टीका त्यांनी केली.