बीड : राजकारणात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करीत असतात. त्याचच उत्तम उदाहरण म्हणजे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यकर्त्याला हेलिकॉप्टर प्रवास घडवून आणत त्यांचं स्पप्न पुर्ण केलंय. मोहन साखरे असं या कार्यकर्त्याचं नाव असून याबाबत त्याने स्वत: सोशल मीडियावर हेलिकॉप्टरमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.
त्याचं झालं असं की, धनंजय मुंडे अपघातानंतर रुग्णालयात उपचारसाठी दाखल होते. मुंडे यांना तब्बल 40 दिवसांनी डिस्जार्ज मिळाल्यानंतर मुंडे यांची हेलिकॉप्टरमध्ये बीडमधील परळीत एन्ट्री झाली. त्यावेळी मुंडे यांनी भेटण्यासाठी हेलिपॅडवर अनेकजण उपस्थित होते. त्याचं गर्दीत मुंडेंचा निष्ठावान कार्यकर्ता मोहन साखरे देखील होते.
Kasba By Election : प्रचारात गुंडांना घेऊन दहशतीचा प्रयत्न, अजित पवारांचा गिरीश महाजनांवर आरोप
मुंडे यांना पाहताच साखरे भावूक होऊन त्यांना भेटले. त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले “मोहन तुला भावूक व्हायला काय झालंय, मी ठीक आहे. तुला हेलिकॉप्टरमध्ये फिरण्याची इच्छा आहे ना जा हेलिकॉप्टरने प्रवास करुन ये” असं म्हणत मुंडे यांनी साखरे यांचा हेलिकॉप्टर प्रवास घडवून आणला.
Swara Bhasker: अडकली विवाह बंधनात; पाहा फोटो
एका सर्व सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यासाठी धनंजय मुंडे यांनी हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्याची संधी देणे म्हणजे एक स्वप्न साकार होणे हा सुखद योग लाभला. धनंजय मुंडे कार्यकर्त्याला किती जीव लावतात याची अनुभूती प्रत्यक्षात आल्याचं मोहन साखरेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टद्वारे म्हटलंय.
kasba By Election : खासदार गिरीश बापटांच्या जीवाशी खेळू नका, मविआच्या नेत्यांनी टोचले कान
दरम्यान, गरिबांच्या नशीबात हेलिकॉप्टरमध्ये बसणेच काय जवळ जाणंही स्वप्न कधी पुर्ण होत नाही मात्र, धनंजय मुंडे यांच्यामुळे मला हेलिकॉप्टरने प्रवास करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, या शब्दांत साखरे यांनी आभार मानले आहेत.