राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राजभवन परिवाराकडून अलविदा…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राजभवन परिवाराकडून अलविदा…

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अखेर राजभवन परिवाराच्यावतीने हृद्य निरोप देण्यात आला आहे. यावेळी राजभवनातील कर्मचार आणि अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह त्यांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप देण्यात आलाय.

राज्यपालांना निरोप देण्यात आल्यानंतर त्यांना उद्या भारतीय नौदलाच्यावतीने मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर कोश्यारी देहरादूनकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्तीची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यपाल कोश्यारींनी आपला राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला.

Devendra Fadnavis च्या गौप्यस्फोटावर अजित पवार संतापले, ‘पुन्हा पुन्हा तेच…’

कोश्यारी यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून करण्यात आली असून राष्ट्रपतींकडून देशभरातील १३ राज्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर आता झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहणारे रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांकडून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर करण्यात आला होता. राज्यापाल कोश्यारींच्या महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून कोश्यारी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली होती. त्यावेळी राज्यातील विविध संघटनांसह विरोधी पक्षांकडून राज्यापाल कोश्यारींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात करण्यात आली होती. त्यानंतरच राज्यपाल कोश्यारी यांनी पदमु्क्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

BJP : मंत्री विखेंची अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशाची ऑफर; म्हणाले, काँग्रेससाठी..

अखेर राज्यपाल कोश्यारींच्या जागी आता नवे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच बैस राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube