Devendra Fadnavis च्या गौप्यस्फोटावर अजित पवार संतापले, ‘पुन्हा पुन्हा तेच…’

Devendra Fadnavis च्या गौप्यस्फोटावर अजित पवार संतापले, ‘पुन्हा पुन्हा तेच…’

मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गौप्यस्फोटवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करणे टाळले. शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

‘देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. पुन्हा पुन्हा तेच उगाळून काढू नका.’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रीया दिली होती. ते म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस सुज्ञ नेते आहेत परंतु, ते अशा पद्धतीने खोटे वक्तव्य करतील असे वाटले नव्हते असे प्रत्युत्तर फडणवीसांना दिले होते. त्यानंतर आज अजित पवारांनाही फडणवीसांच्या गोप्यस्फोटावर प्रतिक्रिया विचारण्यात आली.

हे देखील वाचा
kasbah Bypoll Election : नाकात नळी, थरथरते हात: गिरीश बापटांचा कार्यकर्त्यांना संदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला. ते म्हणाले, ”मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार.”

पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस अजूनही ठाम आहेत. “मी एवढंच सांगेन की, मी जे काही बोललो आहे, ते सत्य बोललो आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका… म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे.

तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्‍या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही,” असे फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या काळात फडणवीस आणखी कोणते खुलासे करणार आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube