kasbah Bypoll Election : नाकात नळी, थरथरते हात: गिरीश बापटांचा कार्यकर्त्यांना संदेश

kasbah Bypoll Election : नाकात नळी, थरथरते हात: गिरीश बापटांचा कार्यकर्त्यांना संदेश

पुणे : कसब्याची निवडणूक (kasbah Bypoll Election) चूरशीची वैगरे काही नाही. आपण निवडणूक जिंकणार. चांगल्या मताने जिंकणार. नक्की निवडूण येणार.दोघांचे काम चांगले आहे. काळजी करू नका. निवडूण आल्यावर मी स्वत पेढे वाटायला येईन, असा विश्वास पुण्याचे भाजप (BJP) खासदार गिरीष बापट (Girish bapat) यांनी व्यक्त केला. जिवाची तमा न बाळगता बापट पक्षासाठी पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

‘१९६८ सालानंतर ही पहिली निवडणूक ज्यात मला सक्रिय होता येत नाहीय. अनेक निवडणूका आपला पक्ष लढला. कधी हारलो कधी जिंकलो. पक्ष संघटना मजबूत झाली, गिरीश बापट म्हणाले. कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट यांनी हजेरी लावली आहे. नाकात नळी, थरथरते हात अन् व्हिलचेअरवर गिरीश बापटांनी केसरी वाड्यातील पक्षाच्या बैठकीत पक्षनिष्ठा दाखवून दिली.

खासदार गिरीश बापटांच्या अध्यक्षतेखाली टिळक कुटुंबीयांच्या केसरी वाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासोबतच भाजपचे उमेदवार हेमंत रासने, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर, शैलेश टिळक, कुणाल टिळक उपस्थित होते.

आजारपणामुळे त्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं शक्य नव्हतं. मात्र त्यांनी आपल्या भावना वजा संदेश एका कागदावर लिहून दिला आणि हेमंत रासने यांना कार्यकर्त्यांना वाचून दाखवायला सांगितलं.

हे देखील वाचा
kasba By Election : खासदार गिरीश बापटांच्या जीवाशी खेळू नका, मविआच्या नेत्यांनी टोचले कान

गिरीश बापटांचा संदेश
तुम्हा सगळ्यांना बऱ्याच दिवसांनी भेटून आनंद वाटला. सगळ्यांना सुरुवातीला धन्यवाद देतो. माझ्या आजारपणामुळे मला सगळ्यांशी बोलणं शक्य होत नाही आहे. सर्वांनी खूप काम करा, उमेदवार नक्की निवडून येईल. तुमच्याशी वेळोवेळी संपर्क करेन, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एका कागदावर लिहून दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube