Download App

पुढची दहा वर्ष शिंदेच मुख्यमंत्री हवे; दोन वर्ष पूर्ण होताच पिळगावकर-कोठारेंकडून स्तुतीसुमनं

CM Shinde च्या कार्यकाळातील कामांचं कौतुक करत सचिन पिळगावकर महेश कोठारे यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं उधळली

Dharmaveer 2 Sachin Pilgaonkar Mahesh Kothare Appreciate CM Shinde : पुढची दहा वर्ष शिंदेंनीच मुख्यमंत्री (CM Shinde) राहावं शिंदेंच्या कार्यकाळातील कामांचं कौतुक करत अभिनेते सचिन पिळगावकर ( Sachin Pilgaonkar) आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. ते ‘धर्मवीर 2’ या सिनेमाच्या दुसऱ्या पोस्टर लॉंन्च सोहळ्यामध्ये बोलत होते.

जोडप्याला मारहाण प्रकरणी तृणमूलच्या आमदाराचं ‘अजब’ विधान, म्हणाले, मुस्लीम राष्ट्रात…

‘धर्मवीर… मुक्कम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांचा जीवनप्रवास माडंला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. धर्मवीर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘धर्मवीर 2’ (‘Dharmaveer 2’) चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून आज या सिनेमाचं दुसरं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर लॉंच करण्यात आले. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

Barzakh Trailer: भूत, प्रेम आणि सस्पेन्स! फवाद खान-सनम सईदच्या ‘बरजाख’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

त्यावेळी बोलताना धर्मवीर 2 या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच पुढील दहा वर्ष एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहायला हवे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर अभिनेते सचिन पिळगावकर आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी देखील देसाई यांच्या या म्हणण्याला दुजोरा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचं कौतुकही केलं. तसेच या सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना 30 जून रोजी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दोन वर्षे पूर्ण झाल्या निमित्त त्यांचा अभिनंदनही करण्यात आलं.

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाच्या पोस्टर लॉंचच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे देखील उपस्थित होते. धर्मवीर – २ या चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावर बसलेले दिसतात. ‘हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’, अशी टॅग लाईनही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कमालीची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे.

follow us